________________
१३०
क्लेश रहित जीवन
संशय, भांडणाचे एक कारण घरात बहुतांशी भांडणे संशयावरून होत असतात. हे कसे आहे की, शंकेमुळे स्पंदन निर्माण होतात आणि या स्पंदनामुळे स्फोट होतो. आणि जर निःशंक राहिलात तर स्फोट आपोआप शांत होईल. नवराबायको दोघेही जर संशयी असतील तर मग स्फोट कसा विझेल. एकाला तरी नि:शंक व्हावेच लागेल. आई-वडिलांच्या भांडणामुळे मुलांचे संस्कार बिघडतात. मुलांवर वाईट संस्कार पडू नयेत यासाठी दोघांनी घरात समजदारीने वागले पाहिजे. हा संशय कोण दूर करेल? आपले ज्ञान तर मनुष्याला संपूर्ण निःशंक बनवेल असे आहे! आत्म्याच्या अनंत शक्ती आहेत!!
अशा वाणीला निभावून घ्या. ही टीपॉय पायाला लागली तर आपण तिला दोष देत नाही, पण कोणी दुसऱ्याने मारले तर मात्र आपण त्याला गुन्हेगार मानतो. कुत्रा चावत नसेल फक्त भुंकतच असेल तर आपण त्याला चालवून घेतो ना! मग माणूस देखील हात न उगारता नुसता भुंकत असेल तर आपण ते निभावून घ्यायला नको का? भुंकणे म्हणजे बोलणे, 'टू स्पीक,' आणि 'बार्क' म्हणजे भुंकणे. 'माझी बायको सतत भुंकत असते' असे म्हणतात ना? हे वकील सुद्धा कोर्टात भुंकत असतात ना? आणि न्यायाधीश त्या दोघांचे भुंकणे ऐकत असतात! हे वकील निर्लेपतेने भुंकता ना? कोर्टात समोरासमोर 'तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात, माझ्या अशिलावर तुम्ही खोटे आरोप करत आहात' असे भुंकत असतात. त्यांना पाहून आपल्याला असे वाटते की, हे दोघे बाहेर जाऊन मारामारीच करतील, पण बाहेर आल्यानंतर पाहिले तर दोघेही सोबत बसून आरामात चहा पित असतात!
प्रश्नकर्ता : याला ड्रामेटिक (नाटकी) भांडण म्हणायचे का? दादाश्री : नाही याला पोपटमस्ती म्हणतात. ड्रामेटिक तर ज्ञानी