________________
१२८
क्लेश रहित जीवन
आमच्याकडून 'स्वरूपज्ञान' प्राप्त करून घ्या. म्हणजे मग सारे वैर भाव मिटतील. अगदी याच जन्मात सगळे वैरभाव सोडून द्यायचे, आम्ही तुम्हाला मार्ग दाखवू. संसाराला कंटाळून लोक मरणाच्या वाट्याला का जातात? या बाह्य संकटांना तोंड देवू शकत नाहीत म्हणून. हे सर्व समजावे तर लागेल ना? कुठपर्यंत ताण-तणावाखाली पडून राहाल? हे तर किड्यामुंग्यांसारखे जीवन झालेले आहे. नुसती तडफड, तडफड! मनुष्यजन्मात आल्यावर तडफड का म्हणून? जो ब्रम्हांडाचा मालक म्हटला जातो त्याची ही अशी दैनावस्था! संपूर्ण जग तडफडत तरी आहे किंवा मूर्छित अवस्थेत तरी आहे. जगात या दोनच गोष्टी आहेत आणि तू ज्ञानघन आत्मा झालास म्हणजे यातून सुटला.
जसा अभिप्राय तसा परिणाम प्रश्नकर्ता : ढोल वाजत असेल तर काही लोकांना चीड का येते?
दादाश्री : कारण 'मला हे आवडत नाही' असे त्याने मानल आहे. ढोल वाजतेवेळी तुम्ही म्हणावे की, 'वाह!' ढोल किती छान वाजतो आहे !!!' असे म्हटले तर त्रास होणार नाही. 'ढोलाचा आवाज वाईट आहे' असा अभिप्राय दिला की, आतून सारी यंत्रणा बिघडून जाते. तेव्हा आपण नाटकीय भाषेत म्हणावे की, खूप छान ढोल वाजवला.' म्हणजे मग त्रास होत नाही.
हे 'आत्मज्ञान' मिळाल्यामुळे आता आपण सगळी 'पेमेंट' चुकवू शकतो. कठीण परिस्थितीत हे ज्ञान खूप हितकारी आहे, ज्ञानाची ‘टेस्टिंग' होऊन जाते. ज्ञानाची रोज 'पॅक्टिस करायला गेलो तर त्याच्याने काही टेस्टिंग होत नाही. पण एकदा का कठीण प्रसंग आला तेव्हा मात्र टेस्टेड होऊन जाते!
ही सद्विचारणा, किती छान आम्हाला तर एवढे माहीत आहे की, जर भांडण केल्यानंतर