________________
१२६
क्लेश रहित जीवन
उरलेला नाही. फक्त धर्म जरी राहिला असता तरी घरात भांडणे झाली नसती. झाले तर महिन्यातून एखाद्या वेळीच झाले असते. अमावस्या महिन्यातून एकदाच येते ना!
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : इथे तर तीसही दिवस अमावस्या. भांडण करण्यात काय मिळत असेल?
प्रश्नकर्ता : फक्त नुकसानच होते.
दादाश्री : तोटा होणारा व्यापार तर कुणी करतच नाही ना? कोणीच म्हणणार नाही की, तोटा होणारा धंदा करा! काहीतरी नफा मिळवतच असतील ना?
प्रश्नकर्ता : भांडणातून आनंद मिळत असेल!
दादाश्री : हा दुषमकाळ आहे म्हणून शांती राहत नाही, पोळलेला मनुष्य जेव्हा दुसऱ्याला पोळतो तेव्हाच त्याला शांती वाटते. कोणी आनंदात असेल तर त्याला ते आवडत नाही, म्हणून तिथे जाऊन काडी लावतो तेव्हाच त्याला शांती वाटते. असा जगाचा स्वभावच आहे. प्राण्यांमध्ये सुद्धा विवेक असतो, ते भांडत नाहीत. कुत्रे सुद्धा आपल्या परिसरातील कुत्र्यांशी भांडत नाहीत. जेव्हा बाहेरचा कुत्रा त्यांच्या परिसरात येतो तेव्हा ते सगळे मिळून त्याच्याशी भांडतात. तेव्हा ही मूर्ख माणसे तर आपापसातच लढतात. लोक अगदी विवेकशून्य झाले आहेत!
'भांडणमुक्त' होण्यासारखे प्रश्नकर्ता : मला भांडायचे नसेल, मी कधीच भांडत नाही तरीदेखील घरची माणसे समोरून भांडण उभे करत असतील, तर अशा परिस्थितीत काय करावे?
दादाश्री : तुम्ही 'भांडणमुक्त' व्हायला हवे. भांडणमुक्त व्हाल तर