________________
१२४
क्लेश रहित जीवन
आम्ही जसे असेल तसे सांगून टाकतो. असेही सांगतो आणि तसेही सांगतो, जास्त मोठेपणा कशाला मिरवायचा?
ज्यांच्या जीवनात कसोटी येते ते पुण्यवान म्हटले जाते! म्हणून आग्रह न धरता समस्यांवर तोडगा काढा. तुम्ही स्वतःच तुमचा दोष सांगा. नाहीतर ते जेव्हा तुमचा दोष सांगत असतील तेव्हा तुम्ही खुश व्हा की, अरे वा! तुम्हाला आमचा दोष लक्षात आला। खूप छान झाले! तुम्ही एवढे हुशार आहात हे आम्हाला माहीतच नव्हते.
...समोरच्याचे समाधान करा ना आपल्यात काही चूक असेल तेव्हाच समोरचा आपल्याला सांगत असेल ना? म्हणून चुका संपवा. या जगात कुठलाही जीव कुठल्याही जीवाला त्रास देऊच शकत नाही इतके स्वतंत्र जग आहे, आणि आज जो त्रास होत आहे तो पूर्वी केलेल्या दोषांचा परिणाम आहे. म्हणून चुका संपवा म्हणजे हिशोब संपून जाईल.
कोणी 'लाल झेंडा' दाखवत असेल तर समजून जावे की, यात आपली काही चूक आहे. म्हणून आपण त्यांना विचारावे की, 'भाऊ तू लाल झेंडा का दाखवित आहेस?' तेव्हा तो म्हणेल की, तुम्ही असे का केले होते?' तेव्हा त्याची माफी मागावी आणि म्हणावे की, 'आता तरी हिरवा झेंडा दाखवशिल ना?' तेव्हा तो हो म्हणेल.
आम्हाला कोणी लाल झेंडा दाखवितच नाही. आम्ही तर सगळ्यांचे हिरवे झेंडे पाहतो नंतर पुढे चालतो. निघतेवेळी जर एखाद्याने लाल झेंडा दाखवला तर आम्ही त्याला विचारतो की, 'भाऊ तू का म्हणून मला लाल झेंडा दाखवत आहेस?' तेव्हा तो सांगेल की, 'तुम्ही तर अमुक तारखेला जाणार होता मग त्याआधीच का चालला?' तेव्हा आम्ही त्याला खुलासा करून सांगतो की, अचानक हे काम निघाले म्हणून नाईलाजाने जावे लागत आहे! मग तो आपणहूनच सांगेल की, 'तर मग तुम्ही नक्कीच जा, काही हरकत नाही.'