________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
१२७
संसारात टिकू शकाल. आम्ही तुम्हाला भांडणमुक्त बनवून देऊ. भांडण करणारा सुद्धा कंटाळून जाईल, असे आपले स्वरूप असायला हवे. जगात कोणीच आपल्याला डिप्रेस करू शकणार नाही असे आपण बनायला हवे. आपण भांडणमुक्त झाल्यावर आता काही त्रासच नाही ना? लोकांना भांडायचे असेल, शिव्या द्यायच्या असतील तरीही हरकत नाही आणि तरी सुद्धा निर्लज्ज म्हटले जाणार नाही, उलट त्यामुळे जागृती खूप वाढेल.
सूडाचे बीज हेच भांडणाचे कारण पूर्वी जी भांडणे झाली आहेत त्याच्यामुळे शत्रुत्व धरले जाते आणि तेच आज भांडणाच्या रुपात चुकते केले जाते. भांडण होते त्याचवेळी शत्रुत्वाचे बीज पडते, ते मग पुढच्या जन्मी उगवते.
प्रश्नकर्ता : मग ते बीज कशाप्रकारे नष्ट करता येईल?
दादाश्री : हळूहळू समताभावाने निकाल करत राहिलात तर नष्ट होईल. खूप खोलवर बीज पडले असेल तर वेळ लागेल. धीर धरावा लागतो. तुमचे कुणी काही घेऊन जात नाही. दोन टाईम खायला मिळते, कपडे मिळतात, मग आणखी काय हवे?
जरी तुम्हाला घरात ठेवून बाहेरुन कुलूप लावून गेले पण तुम्हाला दोन वेळेचे जेवण मिळत आहे की नाही एवढेच बघायचे. तुम्हाला घरात कोंडून गेले तरी काही हरकत नाही, तुम्ही निवांत झोपा. मागील जन्मी असे काही वैर बांधले गेले की ज्यामुळे आपल्याला घरात कुलूप लावून कोंडून ठेवतात, ! वैर आणि तेही अज्ञानतेने बांधले गेलेले वैर! समजपूर्वकचे असेल तर आपण समजू शकू की हे समजपूर्वकचे आहे, म्हणून तोडगा निघू शकेल. पण जर समजपूर्वकचे नसेल तर तोडगा कसा निघू शकेल? मग आहे तसेच सोडून द्यायचे.
ज्ञानामुळे वैर भावनेचे बीज नष्ट होते आता आपण सगळे वैरभाव सोडून द्यायवे. तुम्ही कधीतरी