________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
लोक तर तुझ्याच चुकांमुळेच तुला लाल झेंडा दाखवतात पण तू जर त्याचा खुलासा केलास तर लोक तुला जाऊ देतील. पण याला जर कोणी लाल झेंडा दाखवला तर हा मूर्ख बोंबाबोंब करून त्याला म्हणेल, 'जंगली, जंगली बिनअकली, तू मला लाल झेंडा का दाखवतोस?' असे करून त्याला दरडावतो. अरे, तू तर नवीन हिशोब सुरु केलास. कोणी जर लाल झेंडा दाखवत असेल तर ' देअर इज समथिंग राँग.' (तिथे नक्की काही चुकले आहे) विनाकारण कुणी लाल झेंडा दाखवत नाही. भांडण, दररोज कसे परवडणार ?
दादाश्री : घरात भांडणे होतात ?
प्रश्नकर्ता : हो
जातो.
१२५
दादाश्री : वरवर होतात की जोरदार होतात ?
प्रश्नकर्ता : जोरदार पण होतात, पण दुसऱ्या दिवशी विसरून
दादाश्री : विसरणार नाही तर काय करणार ? विसरून जाल तेव्हाच पुन्हा भांडता येईल ना ? आधीचेच विसरलेले नसेल तर पुन्हा कोण भांडण करेल ? मोठमोठ्या बंगल्यात राहतात, पाचच जण राहतात तरी भांडण करतात ! निसर्ग खाण्या-पिण्याचे सर्व देतो तरी हे भांडत राहतात.
जिथे भांडणतंटे आहेत तिथे अंडरडेव्हलप (अविकसित) प्रजा आहे. सार काढता येत नाही म्हणून भांडणे होतात.
जितके मनुष्य आहेत तितके वेगवेगळे धर्म आहेत. पण स्वतःच्या धर्माचे मंदिर कसे बांधावे ? धर्म तर सगळ्यांचेच वेगळे आहेत. उपाश्रयात सामायिक करतात ती सुद्धा प्रत्येकाची वेगळी-वेगळी असते. अरे, कित्येक लोक तर मागे बसून पुढच्यांना खडे मारीत असतात, ती पण त्यांची सामायिकच करतात ना ? यात धर्मही राहिलेला नाही आणि मर्मही