________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
१२३
नाही. तोडल्याने तुटेल असे शक्यही नाही. म्हणून आपण मौन राहावे. कधी ना कधी तो चिडेल तेव्हा आपला हिशोब पूर्ण होईल. आपण मौन बाळगल्याने तो कधीतरी चिडेल आणि स्वतःहून म्हणेल, 'तुम्ही माझ्याशी का बोलत नाही? किती दिवसांपासून मुके बनून फिरत आहात!' तो असा चिडला म्हणजे तुमचा हिशोब पूर्ण झाला, दुसरा काही मार्ग आहे का? हे तर वेगवेगळ्या प्रकारचे लोखंड असतात, आम्ही सगळ्यांना ओळखू शकतो. काही लोखंडाना चांगले तापवले तेव्हा ते वाकते. काही प्रकारच्या लोखंडाना भट्टीत तापवावे लागते आणि मग गरम-गरम असतानाच दोन हातोडे मारले की ते सरळ होतात. ही तर अशी तहेत-हेची लोखंडे आहेत! यात आत्मा हा आत्मा आहे, परमात्मा आहे आणि लोखंड हे लोखंड आहे. हे सर्व धातू आहेत.
सरळ वागल्यानेही प्रश्न सुटतात प्रश्नकर्ता : घरात माझे कुठल्या गोष्टीवर लक्ष राहत नसेल आणि घरातील लोक मला लक्ष ठेवा, लक्ष ठेवा असे म्हणत असतील, तरी देखील लक्ष राहत नसेल तर अशा वेळी काय करावे?
दादाश्री : काहीच नाही. घरातले जेव्हा आपल्याला 'लक्ष ठेवा, लक्ष ठेवा' असे म्हणतील तेव्हा 'हो ठेवतो' असे सांगावे. आपण लक्ष ठेवण्याचा निश्चिय करावा. तरी देखील लक्ष राहिले नाही आणि घरात कुत्रा घुसला तर म्हणा की 'माझे लक्ष राहतच नाही.' म्हणजे त्यावर काही उपाय तर करावा लागेल ना? आम्हाला पण जर कोणी लक्ष ठेवायला सांगितले तर आम्ही लक्ष ठेवतो, तरी देखील काही झालेच तर आम्ही सांगतो, की 'भाऊ, माझ्याकडून लक्ष राहू शकले नाही.'
असे आहे की, आपण यांच्यापेक्षा वयाने मोठे आहोत असे जर मानले नाही तर मग काम होते. लहान मुलासारखी अवस्था ठेवली तर समभावाने निकाल चांगला होतो. आम्ही लहान मुलाप्रमाणे राहतो. म्हणून