________________
१२२
क्लेश रहित जीवन
प्रश्नकर्ता : असे करून देखील तो नरम झाला नाही तर मग काय करावे?
दादाश्री : नरम पडला नाही तर आपण काय करणार? आपण तर सांगून मोकळे व्हायचे. आणखी काय करणार? कधी ना कधी तर तो नरम पडेलच. तुम्ही त्याला रागावून नरम करायला गेलात; पण त्यामुळे तो काही नरम पडणार नाही. आज नरम दिसेल पण तो मनात ते नोंद करून ठेवेल आणि जेव्हा-केव्हा तुम्ही नरम असाल तेव्हा तो सगळा वचपा काढून घेईल. म्हणजे जग हे वैर वसूल करणारे आहे. नियम असा आहे की, लोक मनात शत्रुत्व ठेवतात. मनात सूड घेण्याचे परमाणू साठवून ठेवतात. म्हणून समोरच्याशी शत्रुत्व वाढणार नाही अशा पध्दतीने तोडगा काढावा.
प्रकृती स्वभावानुसार एडजस्टमेन्ट... प्रश्नकर्ता : आपण समोरच्याचा अबोला तोडण्यासाठी विनवले की, खरंच माझी चूक झाली, आता कृपया मला माफ कर. असे सांगून देखील तो अधिकच रागावला तर? काय करू?
दादाश्री : मग तुम्ही बोलणे बंद करा. त्याला तुमचे समोपचाराचे वागणे हा तुमचा कमकुवतपणा वाटत असेल तर त्याची ती चुकीची समजूत आहे की 'बहुत नमे नादान.' अशा प्रसंगी दूर राहणेच चांगले. मग जे झाले ते बरोबर, असे समजून मोकळे व्हा. पण ज्या व्यक्ती सरळ स्वभावाच्या असतील त्यांच्या बाबतीत तरी प्रश्नांचे समाधान करा. आपल्या घरात कोण सरळ आहे आणि कोण वाकडे आहे इतके तर आपल्याला समजतेच ना?
प्रश्नकर्ता : समोरची व्यक्ती सरळ स्वभावाची नसेल तर आपण त्याच्याबरोबरचे व्यवहार (संबंध) तोडायचे का?
दादाश्री : नाही. संबंध तोडायचे नाहीत. संबंध तोडल्याने तुटत