________________
१२०
क्लेश रहित जीवन
प्रश्नकर्ता : सम्यक् म्हणजे कशा प्रकारे ?
दादाश्री : अहोहो! तुम्ही या मुलाला का फेकले? काय झाले?' तेव्हा तो म्हणेल की, 'मी काय मुद्दाम फेकेल? तो माझ्या हातातून निसटला म्हणून पडला.'
प्रश्नकर्ता : पण हे तर ते खोटे बोलले ना?
दादाश्री : ते खोटे बोलत आहेत हे बघण्याची तुम्हाला गरज नाही. खोटे बोलावे की खरे बोलावे ते त्याच्यावर अवलंबून आहे, ते आपल्या हातात नाही. तो त्याच्या मर्जीनुसार बोलेल. त्याला खोटे बोलायचे असेल किंवा तुम्हाला संपवायचे असेल ते त्याच्या नियंत्रणात आहे. रात्री त्याने तुमच्या माठात विष टाकले तर तुम्ही मरणारच ना?! म्हणून जे आपल्या ताब्यात नाही त्याचा विचार करायचा नाही. सम्यक् बोलता येत असेल तर ठीक आहे. सम्यकपणे विचारता आले तर ते कामाचे की, 'भाऊ असे करून तुम्हाला काय फायदा झाला?' मग तो स्वतःहून मान्य करेल. तुम्हाला सम्यक् बोलता येत नाही आणि तुम्ही त्याला पाच पटीने चिडून बोलू लागले तर तो दहा पटीने चिडून बोलेल.
प्रश्नकर्ता : सम्यक् बोलता येत नसेल तर मग काय करायचे?
दादाश्री : मौन राहावे आणि पाहत राहावे की 'क्या होता है?' चित्रपटात मुलांना फेकतात तेव्हा तुम्ही काय करता? बोलायचा अधिकार सगळ्यांनाच आहे पण भांडण वाढणार नाही अशा प्रकारे बोलण्याचा अधिकार आहे. ज्या बोलण्याने भांडण वाढेल असे बोलणे म्हणजे मूर्खपणा आहे.
टकोर, अहंकारपूर्वक नसावी प्रश्नकर्ता : व्यवहारात जर कोणी चूक करीत असेल तर त्याला टोकावे लागते त्यामुळे त्याला दुःख होते, अशा वेळी कसे वागावे?