________________
११८
क्लेश रहित जीवन
वाईट बोलण्यामुळे भांडण वाढले प्रश्नकर्ता : नवऱ्याची भीती, भविष्याची भीती यामुळे 'एडजस्टमेन्ट' घेता येत नाही. तिथे मग 'आपण त्याला सुधारणारे कोण? हे लक्षात राहत नाही आणि समोरच्याला धमकी दिली जाते.
दादाश्री : अशा वेळी 'व्यवस्थित शक्ती' चा उपयोग केला, 'व्यवस्थित शक्तीचे' ज्ञान समजून घेतले तर कुठलाच त्रास होणार नाही. मग काही विचारावेच लागणार नाही. नवरा येईल तेव्हा जेवणाचे ताट वाढून, बसायला पाट देऊन 'जेवायला चला!' असे सांगा. त्यांचा प्रकृती स्वभाव बदलणार नाही. तुम्ही लग्न करतेवेळी ज्या प्रकृतीला पाहून, पसंत करून लग्न केले ती प्रकृती शेवटपर्यंत निहाळायची. मग काय पहिल्याच दिवशी माहीत नव्हते का की, ही प्रकृती अशीच आहे म्हणून? त्याच दिवशी सोडून द्यायचे होते ना! का जास्त नादी लागलात?
या कटकट करण्याने संसारात काहीच फायदा होत नाही, उलट नुकसानच होते. कीटकिट म्हणजे भांडण! म्हणूनच भगवंताने त्यास 'कषाय' म्हटले आहे.
तुमच्या दोघांमध्ये जसजसे 'प्रॉब्लेम' वाढतील तसतसे तुम्ही दूर होत जाल. 'प्रॉब्लेम' सुटले म्हणजे दुरावा राहणार नाही. दुराव्यामुळे दुःखं आहेत. आणि अडचणी सगळ्यानांच येणार. फक्त तुम्हालाच आहे असे नाही. ज्यांनी ज्यांनी लग्न केले त्या सगळ्यांनाच 'प्रॉब्लेम' आहेत.
कर्माचा उदय झाला की वाद निर्माण होतात, पण त्यावेळी जिभेने वाईट बोलणे बंद करा. जे बोलायचे ते पोटातच ठेवा. घरातही बोलू नका आणि बाहेरही बोलू नका.
अहो! व्यवहाराचा अर्थच... प्रश्नकर्ता : प्रकृती (स्वभाव) सुधारता येत नाही पण व्यवहार तर सुधारता आला पाहिजे ना?