________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
'रिवोल्यूशन' आहेत आणि तुमचे पाचशे 'रिवोल्यूशन' आहेत आणि तुम्हाला (तिचे म्हणणे समजून घेण्यासाठी) मध्ये 'काऊन्टरपुली' टाकता आली नाही तर ठिणग्या उडणारच, भांडणे होणारच. अरे ! कित्येक वेळा 'इंजिन' सुद्धा तुटून जाते. 'रिवोल्यूशन' म्हणजे काय हे समजले का तुम्हाला ? तुम्ही एखाद्या मजुराशी बोलत असाल तर तुम्ही काय बोलत आहात ते त्याला कळणारच नाही. त्याचे रिवोल्यूशन पन्नास असतील आणि तुमचे पाचशे असतील, कोणाचे हजार असतील, तर कोणाचे बाराशे सुद्धा असतील. ज्याचे जसे 'डेवलपमेन्ट,' त्याप्रमाणे त्याचे रिवोल्यूशन असतात. मध्ये काऊन्टरपुली टाकून गती कमी केलीत तरच तुमचे बोलणे त्याला समजेल. काऊन्टरपुली म्हणजे (समोरच्याला समजेल अशा पद्धतीने) तुम्हाला मध्ये पट्टा टाकून तुमचे रिवोल्यूशन कमी करावे लागतील. मी प्रत्येकाशी बोलताना काऊन्टरपुली वापरतो. फक्त अहंकार काढून टाकल्याने भागत नाही. त्याखेरीज प्रत्येकाशी बोलताना काऊन्टरपुली पण वापरावी लागते. म्हणूनच माझे कोणाशीही मतभेद होत नाहीत. आमच्या लक्षात येते की, या माणसांचे एवढेच 'रिवोल्यूशन' आहेत. म्हणून मी त्याप्रमाणे काऊन्टरपुली टाकतो. आमचे तर लहान मुलाशी सुद्धा चांगले जमते. कारण आम्ही त्याच्याशी बोलताना रिवोल्यूशन चाळीसपर्यंत खाली आणतो. म्हणून आमचे बोलणे त्याला समजते, नाही तर ती मशीन तुटून जाईल. (त्याच्यावर ताण पडेल)
११७
प्रश्नकर्ता : समोरच्या व्यक्तीच्या लेव्हलवर आल्यानेच त्याच्याशी संवाद शक्य होतो, असेच ना ?
दादाश्री : हो, त्याच्या रिवोल्यूशन वर आलात तरच संवाद साधला जाऊ शकतो. तुमच्याशी बोलत असताना आमचे रिवोल्यूशन कुठल्या कुठे जाऊन येतात! संपूर्ण वर्ल्डमध्ये फिरून येतात !! तुम्हाला काऊन्टरपुली टाकता येत नाही मग त्यात कमी रिवोल्यूशन असणाऱ्या इंजिनाचा काय दोष? तो तर तुमचाच दोष की तुम्हाला काउन्टरपुली टाकता आली नाही !