________________
११६
क्लेश रहित जीवन
सुद्धा भगवंत बसलेले आहेत म्हणून अपशकून वगैरे काही होत नाही. तू गाढवाचा तिरस्कार करशील तर तो तिरस्कार गाढवाच्या आत बसलेल्या भगवंताला पोहोचतो, म्हणून त्याचा तुला भयंकर दोष लागतो. पुन्हा असे घडता कामा नये. अर्थात लोकांना असे चुकीचे ज्ञान झाले आहे त्यामुळे लोक 'एडजस्ट' होऊ शकत नाहीत.
'काऊन्टरपुली'- एडजस्टमेन्टची पध्दत
प्रथम आपण आपले मत मांडू नये. समोरच्याला विचारावे की या बाबतीत तुझे काय मत आहे ? समोरचा माणूस आपल्या मताचा हट्ट धरून बसला असेल तर आम्ही आमचे मत सोडून देतो. आपण तर फक्त एवढेच बघायचे की कोणत्याही कारणाने समोरच्याला दुःख व्हायला नको. आपला अभिप्राय (मत) समोरच्यावर लादता कामा नये. समोरच्या व्यक्तीचा अभिप्राय आपण घ्यावा. आम्ही तर सर्वांचा अभिप्राय घेऊनच 'ज्ञानी' झालो आहोत. मी जर माझा अभिप्राय समोरच्यावर लादायला गेलो तर मीच कच्चा सिद्ध होईल. आपल्या अभिप्रायामुळे कोणालाही दुःख होता कामा नये. तुझे 'रिवोल्यूशन' (गती-समजशक्ती) अठराशे असतील आणि समोरच्याचे सहाशे असतील आणि तू तुझा अभिप्राय त्याच्यावर ठोकून बसवायला गेलास तर त्याचे इंजिन तुटून जाईल. त्याचे सगळे गियर बदलावे लागतील.
प्रश्नकर्ता : 'रिवोल्यूशन' म्हणजे काय?
दादाश्री : या विचारांचा जो वेग असतो तो प्रत्येकाचा वेगळा असतो. काही तरी घडले की मन एका मिनिटात तर किती साऱ्या गोष्टी दाखवून देते, त्याचे सर्व पर्याय एट-ए-टाइम, एकाच वेळी दाखवून देते. या मोठमोठ्या पंतप्रधानांचे एका मिनिटात बाराशे-बाराशे 'रिवोल्यूशन' फिरत असतात, तर आमचे पाच हजार असतात. महावीर भगवंतांचे तर लाख-लाख 'रिवोल्युशन' फिरत असत!
हे मतभेद होण्याचे कारण काय? समजा तुमच्या बायकोचे शंभर