________________
११४
क्लेश रहित जीवन
त्याच्याशी लगेच एडजस्ट होतो, आणि त्याला सांगतो, 'ती तर पहिल्यापासूनच नव्हती!' तू आता का बरे शोधायला आलास? तुला तर हे आज समजले, पण मला तर लहानपणापासून माहीत आहे. असे म्हटले म्हणजे वाद मिटला ना? मग तो पुन्हा आपल्याजवळ अक्कल काढायला येणारच नाही. असे केले नाही तर आपण 'आपल्या घरी' (मोक्षाला) केव्हा पोहोचू?
आम्ही हा सरळ आणि सुलभ रस्ता दाखवित असतो. आणि अशी भांडणे काय रोज-रोज होतात? ते तर जेव्हा आपल्या कर्माचा उदय होतो तेव्हाच होतात, तेवढ्या पुरतीच 'एडजस्टमेन्ट' करायची असते. घरात जर बायकोशी भांडण झाले तर भांडण झाल्यावर बायकोला हॉटेलमध्ये नेऊन खाऊ-पिऊ घालून खुश करा. आता भांडणाचा तंत (अंश) देखील शिल्लक राहता कामा नये.
एडजस्टमेन्टला आम्ही न्याय म्हणतो. आग्रह-दुराग्रह हे काही न्याय नाही. कोणत्याही प्रकारचा आग्रह धरणे म्हणजे न्याय नाही. आम्ही कशाचाही आग्रह धरून ठेवत नाही. ज्या पाण्याने मुग शिजतील त्या पाण्याने शिजवा, शेवटी गटारीच्या पाण्याने पण शिजवा!!
वाटेत दरोडेखोर आले आणि त्यांच्याशी वाद घातला, 'डिसएडजस्ट' झालो तर प्राण गमवाल. त्याऐवजी आपण ठरवायचे की, त्याला 'एडजस्ट' होऊन प्रसंगाला तोंड द्यायचे आहे. त्याला विचारा की, 'बाबा रे, तुला काय हवे आहे? आम्ही तर यात्रेला निघालो आहोत.' अशाप्रकारे त्याला एडजस्ट होऊन जावे.'
या बांद्राच्या खाडीतून दुर्गंध येतो म्हणून आपण त्या खाडीशी भांडायला जातो का?तशीच ही माणसेही दुर्गंध देतात मग काय त्यांना काही बोलायला हवे का? दुर्गंध देणाऱ्यांना खाडी (नाला) म्हणतात आणि सुगंध पसरवतात त्यांना बाग म्हणतात. जे-जे दुर्गंध देतात ते सगळे आपल्याला हेच सांगतात की, तुम्ही आमच्याप्रति वीतराग राहा.