________________
११२
क्लेश रहित जीवन
व्यवहार निभवा एडजस्ट होऊन प्रश्नकर्ता : संसारात राहायचे तर 'एडजस्टमेन्ट' एकतर्फी असायला नको ना?
दादाश्री : व्यवहार त्यास म्हणता येईल की, आपले 'एडजस्टमेन्ट' पाहून शेजारीही म्हणतील की, सगळ्यांच्या घरी भांडणे होतात पण यांच्या घरी मात्र कधीही भांडण पाहिले नाही. असा व्यवहार सर्वात उत्तम म्हटला जाईल. ज्यांच्याशी जमत नाही तिथेच शक्ती विकसित करायची आहे, ज्यांच्याशी जमते तिथे तर शक्ती आहेच. जिथे जमत नाही तिथे तुमचा कमकुवतपणा आहे. माझे सगळ्यांबरोबर का जमते? तुम्ही जेवढे 'एडजस्टमेन्ट' घ्याल तेवढी तुमची शक्ती वाढेल आणि कमकुवतपणा कमी होत जाईल. सगळ्या गैरसमजुती जेव्हा दूर होतील, तेव्हाच खरी समज येईल.
'ज्ञानी' पुरुष तर, समोरचा जरी वाकडा वागत असेल तरीही त्याच्याशी 'एडजस्ट' होतात, 'ज्ञानी पुरुषांना' पाहून आपण सुद्धा तसे वागलो तर सगळ्या प्रकारच्या एडजस्टमेन्ट घ्यायला जमतील. या मागेच सायन्स काय सांगते की तुम्ही वीतराग व्हा. राग-द्वेष करू नका. ही तर आतमध्ये थोडीफार आसक्ती असते, त्यामुळे मार पडतो. अशा व्यवहारात जे एकपक्षी, नि:स्पृह झाले त्यांना वाकडे म्हणावे लागेल. आपल्याला गरज असेल तेव्हा समोरचा वाकडा वागत असेल तरी देखील त्याला समजावून पटवून वळवून घ्यावे लागते. स्टेशनवर सामान उचलण्यासाठी हमाल हवा असेल आणि तो पैशांसाठी वाद घालत असेल तर त्याला चार आणे जास्त देऊन सुद्धा पटवावे लागते, आणि तसे जर केले, नाही तर ती बॅग आपल्यालाच उचलावी लागेल ना?
'डोन्ट सी लॉझ, प्लीज सेटल' (कायदा पाहू नका, कृपया समाधान करा), समोरच्याला 'सेटलमेन्ट' (जुळवून) घ्यायला सांगायचे, की 'तुम्ही असे करा, तसे करा.' असे सर्व सांगायला वेळच कुठे असतो?