________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
११३
समोरच्या व्यक्तीच्या शंभर चुका असतील तरीही आपण आपली स्वत:चीच चूक आहे असे सांगून पुढे जायला हवे. या काळात 'कायदे' बघत बसायचे असते का? हे तर आत्ता शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले आहे. जिथे पाहावे तिथे पळापळ आणि धावाधाव! लोक गुरफटून गेले आहेत!! घरी जावे तर बायकोची तक्रार, मुले ओरडतात, नोकरीवर गेलो तर शेठ ओरडतो, गाडीत गेलो तर गर्दीत धक्के खावे लागतात! कुठेच शांती नाही. शांती तर पाहिजे ना? कोणी भांडू लागले तर आपल्याला त्याच्याबद्दल दया वाटली पाहिजे की, अरेरे! बिचारा किती त्रासला आहे! इतका त्रासलेला आहे की भांडत आहे ! त्रासतात, चिडतात ते सगळे कमजोर आहेत.
प्रश्नकर्ता : कित्येक वेळा असे होते की, एकाचवेळी दोन व्यक्तींबरोबर एकाच गोष्टीसाठी एडजस्टमेंट घ्यायची असते तर अशा वेळी दोघांशी कसे एडजस्ट होऊ शकतो?
दादाश्री : दोघांशीही एडजस्ट होता येईल. अरे सात माणसांशीही एडजस्टमेन्ट घ्यायची असेल तर घेऊ शकतो. एकाने विचारले, 'माझ्या कामाचे काय केले?' तेव्हा सांगावे हो भाऊ, तुझ्या म्हणण्याप्रमाणे करणार. दुसऱ्यालाही असेच सांगावे. 'तुम्ही म्हणाल तसे करू.' शेवटी 'व्यवस्थित शक्ती' च्या बाहेर काहीच घडणार नाही, म्हणून कुठल्याही परिस्थितीत भांडण उभेच करू नका.
चांगले किंवा वाईट म्हटल्यामुळे ते आपल्याला भुतासारखे त्रास देतात. आपल्याला तर दोघांनाही एक समानच ठेवायचे आहे. एकास चांगले म्हटले म्हणून दुसरा खोटा ठरला मग तो त्रास देतो. पण दोन्हींचे मिश्रण केले म्हणजे मग त्याचा काहीच परिणाम होत नाही. 'एडजस्ट एव्हरीव्हेअर' या सूत्राचा आम्ही शोध लावला आहे. खरे म्हणत असेल त्याच्याशीही आणि खोटे म्हणत असेल त्याच्याशीही, दोघांशीही एडजस्ट व्हायचे. आम्हाला कोणी म्हटले की, 'तुम्हाला अक्कल नाही.' तर आम्ही