________________
१३८
क्लेश रहित जीवन
विचारल्याशिवाय सल्ला देत राहणे याला भगवंताने अहंकार म्हटले आहे. नवऱ्याने विचारले की, 'हे ग्लास कुठे ठेवू' तर बायको म्हणेल की 'इथे ठेवा.' मग तुम्ही ते ग्लास तिथे ठेवा. त्याऐवजी नवरा म्हणेल 'तुला अक्कल नाही का? कुठेतरीच काय ठेवायला सांगतेस?' त्यावर मग बायको म्हणेल, 'मग चालवा तुमची अक्कल आणि ठेवा तुम्हाला हवे तिथे.' आता या गोष्टी कधी संपतील? हा संयोगांचा संघर्ष आहे ! म्हणून हे भोवरे उठता-बसता खाता-पिताना एकमेकांवर सारखे आदळतच असतात! भोवरे आदळतात, खरचटतात आणि कधी कधी त्यातून रक्तही निघते!! इथे तर (शारीरिक नाही पण) मानसिक रक्त निघणार ना! अंगातून रक्त निघत असेल तर ते उलट चांगले, पट्टी बांधली म्हणजे थांबते. पण या मानसिक जखमांवर कोणती पट्टी पण लावता येत नाही!
अशी भाषा कधीच उच्चारु नये घरात कोणाला काही सांगणे हा तर अहंकाराचा सर्वात मोठा रोग आहे. सगळे जण आपापला हिशोब घेऊनच आलेले आहेत! प्रत्येकालाच आपआपली दाढी येतच असते, आपल्याला सांगावे लागत नाही की तू का दाढी उगवत नाही? ती तर त्याला येतेच. सगळे जण स्वतःच्या डोळ्याने पाहतात, कानाने ऐकतात, मग विनाकारण आपण दुसऱ्यांच्या व्यवहारात ढवळाढवळ करण्याची काय गरज आहे ? एक अक्षरही बोलू नका. म्हणूनच आम्ही तुम्हाला हे 'व्यवस्थित शक्ती' चे ज्ञान देत असतो. अव्यवस्थित कधीच घडत नाही. जे अव्यवस्थित वाटते ते सुद्धा व्यवस्थितच आहे. म्हणून हे समजून घेण्याची गरज आहे. कधी पतंगाने गटांगळी खाल्ली तेव्हा दोरा ओढायचा. दोरा आता आपल्या हातात आहे. ज्याच्या हातात दोरा नाही त्याची पतंग गटांगळी मारेलच, तो मग काय करणार? पतंगाची दोरीच हातात नाही आणि विनाकारण आरडाओरडा करतो की माझ्या पतंगाने गटांगळी खाल्ली !
घरी एक अक्षरही बोलू नका. 'ज्ञानी' व्यक्तीखेरीज कोणी एक