________________
क्लेश रहित जीवन
नवरा कोणाला म्हणतात ? संसार निभावून नेतो त्याला. बायको कोणाला म्हणायचे ? घर - नाती निभावून नेते तिला. जे संसार उध्वस्त करतात त्यांना आपण नवरा किंवा बायको कसे म्हणू शकतो ? ते त्यांचे गुणधर्म (कर्तव्य) च विसरलेत असे म्हणावे लागेल. बायकोचा राग आला म्हणून तुम्ही पाण्याचा माठ फेकायचा का ? काही जण तर कप-बशा फोडून टाकतात आणि मग पुन्हा नवीन आणतात. अरे, नवीनच आणायचे होते मग फोडले कशासाठी ? रागाने आंधळे होतात आणि हित-अहित याची शुद्धच विसरतात.
१४०
असे लोक तर नवरे बनून बसलेत. अरे, नवरा असा असला पाहिजे की बायकोला दिवसभर नवऱ्याकडेच बघत राहावेसे वाटेल.
प्रश्नकर्ता : लग्नापूर्वी खूप पाहत असते.
दादाश्री : ती तर जाळे टाकत असते. माशाला वाटते की हा खूप चांगला आणि दयाळू माणूस आहे. माझी खूप काळजी घेईल. पण एक वेळा जाळे चावून तर पाहा, काटा घुसेल. हे सगळे सापळे आहेत !
यात प्रेम कुठे उरले ?
कुटुंबांबरोबर चांगले चालले आहे असे कधी म्हणता येईल की, जेव्हा त्यांना तुमच्या बद्दल प्रेम वाटेल, तुमच्याशिवाय करमणार नाही, तुम्ही कधी येणार, कधी येणार ? असेच त्यांना वाटत राहते.
लोक लग्न करतात पण त्यांच्यात प्रेम नाही. ही तर केवळ विषयासक्ती आहे. प्रेम असेल तर दोघांमध्ये कितीही विरोधाभास (मतभेद) असले तरी प्रेम कमी होत नाही. जिथे प्रेम नाही, तिथे केवळ आसक्ती म्हटली जाईल. आसक्ती म्हणजे संडास ! पूर्वी इतके प्रेम असायचे की नवरा परदेशी गेला आणि परत आला नाही तरी आयुष्यभर बायकोचे संपूर्ण चित्त नवऱ्यातच असायचे. दुसऱ्या कोणाची आठवणच यायची नाही. आणि आता तर नवरा दोन वर्ष आला नाही तर दुसरा नवरा