________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
असतो. म्हणून त्यांना संसारातील अडचणी चालून जातात. पण लोक तर संसारात सुख शोधू पाहतात, यात काय सुख मिळत असेल का ?
पोलम्पोल कुठपर्यंत झाकाल ? !
हे सगळे जग नकली आहे ! घरात भांडून रडून, आणि मग पाण्याने तोंड धुवून माणसे घराबाहेर पडतात!! आपण त्यांना विचारले, ‘कसे आहात चंदुभाऊ ?' तेव्हा तो म्हणेल, 'खूप मजेत आहे. ' अरे तुझ्या डोळ्यात तर अश्रू आहेत, तोंड धुवून आला असेल तरी डोळे तर लाल दिसतात ना? त्यापेक्षा सरळ सांग की, 'मी सध्या दुःखात आहे. ' सगळ्यांना असेच वाटते की दुसऱ्यांना काही दुःखच नाही फक्त मलाच दुःख आहे. पण नाही रे बाबा! सगळेच रडत आहेत. प्रत्येक जण घरी रडून मग तोंड धुवून घराबाहेर पडत आहेत. हे पण एक मोठे आश्चर्यच आहे ना ! तोंड धुवून का घराबाहेर पडता ? तोंड धुतल्याशिवाय निघालात तर लोकांना कळेल की संसारात किती सुख आहे म्हणून ? ! मी रडत बाहेर पडलो, तुम्ही रडत बाहेर पडलात, सगळेच रडत बाहेर पडलात म्हणजे मग समजेल की हे जग पोकळ आहे. लहान वयात वडील वारले म्हणून स्मशानभूमित रडत रडत गेलेत ! घरी आल्यावर अंघोळ केली मग काहीच नाही!! अंघोळ करायचे लोकांनी शिकवले, अंघोळ वैगैरे करून स्वच्छ करून घेतात! असे हे जग आहे ! सगळेच तोंड धुवून बाहेर पडलेले, सगळे पक्के खोटारडे आहेत. त्यापेक्षा खरे बोललात तर ते अधिक चांगले.
१३३
आपल्या महात्म्यांमधून एखादाच मोकळेपणाने सांगतो की, 'दादा आज तर मला बायकोने मारले!' एवढा सरळपणा कुठून आला ? तर आपल्या ज्ञानामुळे आला. दादांना तर सगळ्या गोष्टी सांगू शकतो. अशी सरळता आली तेव्हापासूनच मोक्षाला जाण्याची तयारी झाली. अशी सरळता बघायला मिळत नाही ना ? मोक्षाला जाण्यासाठी सरळ व्हायचीच आवश्यकता आहे. नवरा तर बाहेर छे, छे असे काहीच नाही, असे