________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
११५
असे 'एडजस्ट एव्हरीव्हेअर' झाला नाहीत तर तुम्हीवेडे व्हाल. समोरच्याला विनाकारण डिवचत राहतात म्हणूनच ते वेडे होतात. या कुत्र्याला एकदा डिवचले, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा डिवचले तोपर्यंत तो आपली अब्रू ठेवतो (गप्प बसतो) पण मग आपण पुन्हा पुन्हा डिवचत राहिलो तर शेवटी तोही चावतो. त्यालाही कळते की, हा मला रोजच विनाकारण त्रास देतो, हा तर नालायक माणूस आहे, निर्लज्ज आहे. ही समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. अजिबात वादविवाद करत बसू नका. एडजस्ट एव्हरीव्हेअर.
नाही तर व्यवहारिक अडचणी अडकवतील
प्रथम हा व्यवहार शिकायचा आहे. व्यवहाराची योग्य समज नसल्यामुळे तर लोकांना निरनिराळे त्रास सोसावे लागतात.
प्रश्नकर्ता : तुम्ही सांगितलेल्या अध्यात्मसंबंधी गोष्टींबद्दल तर काही प्रश्नच नाही, परंतु व्यवहारासंबंधी ज्या गोष्टी तुम्ही सांगता त्या देखील अगदी टॉपच्या (उच्च पातळीच्या) आहेत.
दादाश्री : असे आहे ना, की व्यवहारात टॉपचे समजल्याशिवाय कोणी मोक्षाला जाऊ शकले नाही, तुमच्याजवळ लाख मोलाचे आत्मज्ञान असेल पण व्यवहार ज्ञान समजल्याशिवाय कोणी कधी मोक्षात गेले नाहीत! कारण व्यवहारच आपल्याला सोडविणारा आहे ना? व्यवहाराने जर सोडले नाही तर तुम्ही काय कराल? तुम्ही 'शुद्धात्मा' आहातच पण व्यवहाराने तुम्हाला सोडले तर ना? तुम्ही तर व्यवहाराचा गुंता वाढवतच राहता. अरे! झपाट्याने निकाल लावा ना?
या भाऊला सांगितले की, 'जा दुकानातून आईस्क्रीम घेऊन ये.' पण तो अर्ध्यावरून परत आला. आपण विचारले, 'का परत आलास?' तेव्हा तो म्हणेल की, 'रस्त्यात गाढव दिसले म्हणून!' अपशकून झाला!! आता त्याला असे चुकीचे ज्ञान असेल मग त्या चुकीच्या ज्ञानातून त्याला बाहेर काढायला हवे ना? त्याला समजवायला हवे की भाऊ, गाढवात