________________
क्लेश रहित जीवन
गोष्ट निराळी आहे. इथे तर पुढच्या जन्माचाच सांगता येत नाही. अरे, याच जन्मात सोडून जातात ना ! याला घटस्फोट म्हणतात ना ? याच जन्मात दोन नवरे करतील, तीन नवरे करतील !
११०
एडजस्ट झालात, तरीही सुधारेल
म्हणून तुम्ही त्यांना सुधारायचे नाही. त्याही तुम्हाला सुधारणार नाही. जे मिळाले आहे ते सोन्याचे. कोणाचीही प्रकृती कधी सरळ होत नाही. कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहील. म्हणून आपण सावधपणाने वागावे. जशी आहे तशी भले असो, 'एडजस्ट एव्हरीव्हेअर '
रागावण्याच्या ठिकाणीही तुम्ही रागावले नाही तर बायको जास्त सरळ वागते. जो क्रोध करत नाही त्याचा दरारा खूप असतो. आम्ही कधी कोणाला ओरडत नाही. तरी आमचा त्यांना दरारा वाटतो.
प्रश्नकर्ता : तर मग ती सरळ होते ?
दादाश्री : मुळात सरळ करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. या कलियुगातील लोकांना पटत नाही, पण त्याशिवाय गत्यंतर नाही.
प्रश्नकर्ता : पण हा खूप कठीण मार्ग आहे.
दादाश्री : नाही, मुळीच नाही. हा मार्ग कठीण नाही उलट हाच मार्ग सोपा आहे. गायीचे शिंग गायीलाच जड.
प्रश्नकर्ता : पण ती शिंग आपल्यालाही मारते ना ?
दादाश्री : एखाद्या दिवशी आपल्याला लागेल. जसे गाय शिंगे मारायला आली तर तुम्ही सरकता ना, तसेच इथेही सरकून जावे! पण अडचण काय आहे ? तर माझे लग्न झालेले आहे आणि माझी बायको आहे? अरे, ती बायको नाहीच. हा नवराच नाही तर ती बायको कशी असेल? हा तर अडाणी लोकांचा खेळ आहे ! आता आर्यप्रजा राहिलीच कुठे ?