________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
१०९
जमेल त्या मार्गाने स्वत:ची सुटका करून घ्या. आणि मनात असे अजिबात आणू नका की सगळे डोक्यावर चढून बसले तर काय होईल? ते काय चढून बसतील? चढून बसण्याची शक्ती कुणाजवळ नसते. हे सगळे भोवरे कर्माच्या उदयानुसार नाचतात! म्हणून जेम-तेम करून आजचा शुक्रवार क्लेशरहित काढा. कल की बात कल देख लेंगे. (उद्याचे उद्या बघू) दुसऱ्या दिवशी फटाका फुटला तर काहीही करुन त्यास झाका आणि आटोक्यात आणा. मग पुढचे पुढे पाहू. असे करून दिवस पार पाडावेत.
ते सुधारलेले कुठपर्यंत टिकेल? प्रत्येक गोष्टीत आपण समोरच्याला एडजस्ट होत गेलो तर (जीवन जगणे) किती सोपे होऊन जाईल. शेवटी आपल्याला सोबत काय घेऊन जायचे आहे ? कोणी म्हणेल की, 'भाऊ, तिला सरळ करा.' अरे तू तिला सरळ करायला जाशील तर तू वाकडा होशील. म्हणून बायकोला सरळ करायला जाऊ नका, जशी आहे तशीच करेक्ट आहे. तुमचे तिच्याशी कायमचे नाते असले तर वेगळी गोष्ट आहे पण हे तर एका जन्मानंतर तुम्ही कुठे आणि ती कुठे, दोघेही विखुरले जाल. दोघांचा मृत्युकाळ वेगळा, दोघांचे कर्म वेगळे! काही देणे नाही आणि काही घेणे नाही! पुढील जन्मी ती कुठे जाईल ते कोणास ठाऊक? आपण तिला सुधारू आणि ती सुधारलेली पुढच्या जन्मी जाईल दुसऱ्याच्या वाट्याला!
प्रश्नकर्ता : तिच्याबरोबर कर्मबंधन झाले असेल तर पुढच्या जन्मी तिच्याशी भेट होईलच ना?
दादाश्री : भेट होईल, पण वेगळ्या प्रकारे भेट होईल. दुसऱ्या कुणाची तरी बायको होऊन तुमच्याशी गप्पा मारायला येईल. कर्माचे नियम तर आहेतच! हे तर काही ठावठिकाणाच नाही. कोणी एखादाच पुण्यवान मनुष्य असा असतो की जो काही जन्म सोबत राहातो. नेमिनाथ भगवत आणि राजुल नऊ जन्मांपर्यंत सोबतच होते ना! असे असेल तर