________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
१०७
माणूस आहेत ना?'! हे ऐकून बाईसाहेब उत्तर देतील, जाऊ द्या हो, एकदम कुजका माणूस आहे. आता असे ऐकल्यावर लगेच आपल्या लक्षात येणार नाही का की हे जग पोकळ डोलारा आहे आहे ? इथे काहीच खरे नाही.
बायकोने जर महागातली भाजी आणली तर भाजी बघून मूर्ख ओरडतो, 'एवढी महाग भाजी कोणी आणते का? हे ऐकून बायको म्हणेल, 'तुम्ही माझ्यावर का ओरडलात?' असे म्हणून बायाको दुप्पट जोराने ओरडते. यातून कसे सावरायचे? बायकोने जर महाग भाजी आणली असेल तर आपण तिला म्हणावे, छान केलेस, माझे धन्यभाग्य! नाही तर माझ्यासारख्या लोभी माणसाकडून इतकी महाग भाजी घेतली गेली नसती.
आम्ही एका माणसाच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्यांच्या बायकोने दुरूनच चहाचा कप असा आपटून ठेवला. मी लगेच समजून गेलो की या दोघांमध्ये काहीतरी भानगड झाली आहे. मग मी त्या बाईला बोलावले आणि विचारले चहाचा कप असा आपटून का ठेवला? तेव्हा ती म्हणाली, 'छे,छे असे काहीच नाही.' मी तिला म्हटले की तुझ्या मनात काय आहे ते मला समजत आहे. तू माझ्याजवळ का लपवतेस? तू आपटून ठेवले त्यावरून तुझ्या नवऱ्याच्याही लक्षात आले की हकीगत काय आहे. शहाणी होऊन फक्त एवढे हे कपट सोडून दे, तुला जर सुखी व्हायचे असेल तर.'
पुरुष बिचारे भोळे असतात आणि या स्त्रिया तर चाळीस वर्षांपूर्वी तुम्ही वीस-पंचवीस शिव्या दिल्या असतील त्या बोलून दाखवतील की तुम्ही तेव्हा मला अशा शिव्या दिल्या होत्या. म्हणून सांभाळून वागा. स्त्रियांकडून काम करवून घ्या. स्त्री तर तुमच्या काम करवूनच घेईल. पण तुम्हाला मात्र ते जमत नाही.
बायकोला जर दीडशे रुपयांची साडी आणायची असेल तर