________________
१०६
क्लेश रहित जीवन
रिलेटिव्ह शेवटी धोकाच आहे, असे समजते
सर्व नाती रिलेटिव्ह आहेत. यात कोणीच रियल नातेवाईक नाही. अरे हे शरीरच रिलेटिव्ह आहे ना! हा देहच धोकेबाज आहे, मग या देहाचे नातेवाईक किती असतील? या देहाला आपण रोज न्हाऊमाखु घालतो, खाऊ घालतो तरी पण पोटात दुखते तेव्हा आपण म्हटले की, 'मी तुझी रोज एवढी काळजी घेतो तर आज जरा शांत हो ना?' (नको दुखूस). असे म्हणून भागते का? एक क्षणवारही दुखण्याचे थांबत नाही, ते मग आपली अब्रूच काढते. अरे, या बत्तीस दातांमधील एकच दात दुखला ना तरी किंचाळायची वेळ येते. सारे घर भरेल एवढे तर आयुष्यभरात दातवण वापरले, रोजच दात घासत राहतो पण तरीही तोंड साफ होत नाही! ते जसेच्या तसेच. म्हणजे ही तर एक फसवणूकच आहे. एक तर मनुष्य जन्म मिळला आणि तोही हिंदुस्तानात जन्म मिळाला आहे, उच्च जातीत जन्म मिळाला आहे आणि तरी तुला मोक्षाचे काम काढता आले नाही, तर तू भटकलाच समज ! जा, तुझे सर्वच वाया गेले!!
काहीतरी समजावे तर लागेलच ना? जरी मोक्षाची गरज सगळ्यांना नसेल, पण कॉमनसेन्सची गरज तर सगळ्यांनाच आहे ना. हे तर कॉमनसेन्स नसल्यामुळे घरचे खाऊन-पिऊन देखील भांडणे होतात. सगळे जण थोडेच काळाबाजार करतात? तरी पण संध्याकाळ होईपर्यंत घरातील तीन माणसांत तेहत्तीस मतभेद पडतात. यात कुठले सुख मिळते? नंतर दुराग्रही होऊन जगतात. असे स्वाभिमान नसलेले जीवन जगण्यात काय फायदा? मॅजिस्ट्रेट साहेब कोर्टात सात वर्षाची सजा ठोठावून घरी येतात पण घरातील केस मात्र पंधरा-पंधरा दिवसापासून पेंडिंग असते! घरात बायकोशी अबोला धरतात! आपण जर मॅजिस्ट्रेट साहेबांना विचारले, 'साहेब, असे का?' तेव्हा साहेब म्हणतील, 'बायकोच खूप खराब आहे. एकदम जंगली आहे.' आणि जर आपण त्यांच्या बाईसाहेबांना विचारले की, 'का हो, साहेब तर खूप चांगले