________________
१०४
क्लेश रहित जीवन
माझ्याच गळ्यात वरमाला पडणार, म्हणून ते डोके झुकवून उभे राहत! अशाप्रकारे जर मुलगी आपल्याला पसंत करत असेल त्यापेक्षा तर जन्म न घेतलेलाच बरा! आज तेच मूर्ख स्त्रियांचा भयंकर अपमान करून वैर वसूल करत आहे ! मुली पाहायला जातात तेव्हा तिला सांगतात 'अशी फिर, तशी फिर'
कॉमनसेन्सने सोल्युशन येते मी सगळ्यांनाच असे म्हणत नाही की तुम्ही सगळे मोक्षाला चला. मी तर असे म्हणतो की 'जीवन जगण्याची कला शिका.' लोकांकडून थोडेफार तर 'कॉमनसेन्स' शिका! तेव्हा शेठ लोक मला म्हणतात की आमच्यात तर कॉमनसेन्स आहे.' तेव्हा मी म्हणालो, 'कॉमनसेन्स असेल तर असे होणारच नाही. तुम्ही तर मूर्ख आहात.' शेठने विचारले कॉमनसेन्स म्हणजे काय? मी म्हणालो, 'कॉमनसेन्स म्हणजे एव्हरीव्हेअर एप्लीकेबलथियरीटीकली अॅज वेल अँज पॅक्टीकली.' कुलूप कसेही असो, गंज लागलेले असो किंवा कसेही असो, त्यात किल्ली घातली लगेच की उघडते, याला म्हणतात कॉमनसेन्स. तुमची कुलूपे उघडत नाहीत. तुम्ही सारखे भांडता आणि कुलूपे तोडता! अरे, तुम्ही तर कुलूपावर मोठा हातोडाच मारतात!
तुमच्यात मतभेद होतात का? मतभेद म्हणजे काय? कुलूप उघडता आले नाही, कुलूप उघडण्यासाठी कॉमनसेन्स कुठून आणणार? मला असे सांगायचे आहे की, तुमच्याकडे पूर्णपणे तीनशे साठ डिग्रीचे कॉमनसेन्स नसेल हे मान्य आहे, पण चाळीस डिग्री, पन्नास डिग्रीचे असायला नको का? पण तसे लक्षात घेतले तर ना? जर कोणी शुभ विचार करण्यात गुंतला असेल तर त्याला त्या शुभ विचारांची आठवण येईल आणि तो जागृत होईल. शुभ विचारांचे बीज पडले की मग शुभ विचार करण्याचे सुरु होऊन जाते. पण हा शेठ संपूर्ण दिवस लक्ष्मीच्या आणि फक्त लक्ष्मीच्याच विचारात मग्न असतो! म्हणून मला शेठला