________________
क्लेश रहित जीवन
तिला पंचवीस रुपये जास्त द्या. ती ते सहा महिने तरी लक्षात ठेवेल. या साध्या साध्या गोष्टी समजून घ्या. जीवन जगणे ही एक कला आहे ! जीवन जगण्याची कला तर येत नाही आणि लग्न करायला निघतात. बिन सर्टिफिकेटचे पती बनायला निघाले, पती होण्यासाठीच्या पात्रतेचे सर्टिफिकेट असायला पाहिजे तेव्हाच बाप होण्याचा अधिकार प्राप्त होईल. हे तर योग्यता नसताना बाप बनतात आणि आजोबा पण बनतात ! असे कुठपर्यंत चालेल ? थोडेतरी समजायला हवे.
रिलेटिव्हमध्ये तर जोडणे शिका
१०८
ही सगळी नाती 'रिलेटिव्ह' आहेत. ही नाती जर खरी- रियल असती तर बायको जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत मी हट्ट सोडणार नाही, हा आग्रह ठीक आहे. पण हे तर 'रिलेटिव्ह' ! 'रिलेटिव्ह' म्हणजे तासभर जरी बायकोशी कडाक्याचे भांडण झाले तर दोघांच्या मनात 'घटस्फोट' घेण्याचा विचार येतो, नंतर त्या विचारबीजाचे झाड होते. तुम्हाला जर बायको हवी असेल तर ती जेव्हा जेव्हा फाडेल तेव्हा तेव्हा तुम्ही जोडत रहा. तरच हे ‘रिलेटिव्ह' संबंध टिकतील, नाही तर तुटतील. वडिलांबरोबर सुद्धा ‘रिलेटिव्ह' संबंध आहे. लोक तर 'रियल' संबंध मानून वडिलांबरोबर हट्ट करतात. वडील सुधरत नाहीत तोपर्यंत काय हट्ट धरून बसायचा ? अरे सोड रे बाबा, असे सुधारत - सुधारत तर म्हातारा मरून जाईल ! त्यापेक्षा त्याची सेवा कर ना, बिचारा वैर बांधून जाईल त्यापेक्षा त्याला निवांत मरू दे ना ! त्याची शिंगे त्यालाच जड. कोणाची वीस-वीस फुटांची लांब शिंगे असतात, त्याचे ओझे आपल्याला कशाला ? ! ज्याचे असतील त्याला ओझे !
तुम्हाला तुमची कर्तव्ये पार पाडायची आहेत. म्हणून दुराग्रह करू नका. ताबडतोब समस्यांचे समाधान करा. तरीही समोरची व्यक्ती जास्त भांडत असेल तर म्हणावे की, मी पहिल्यापासूनच अडाणी आहे, मला काहीच समजत नाही. असे बोलतात तर तो तुम्हाला सोडून देईल.