________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
१०५
सांगावे लागते की, 'शेठ तुम्ही लक्ष्मीच्या मागे पडले आहात, घर पूर्ण उद्ध्वस्त झाले आहे.' मुली गाडी घेऊन इकडे जातात, मुले तिकडे जातात आणि शेठानी पण इकडे-तिकडे फिरत असते. 'शेठ, तुम्ही तर चहूबाजूंनी लुटले गेले!' तेव्हा शेठने विचारले 'मग मी काय करु?' मी म्हणालो, 'नीट समजण्याचा प्रयत्न करा ना. जीवन कसे जगावे ते समजा. फक्त पैशांच्याच मागे धावू नका. तब्येतीची काळजी घ्या, नाही तर हार्टफेल होईल.' तब्येतीची काळजी, पैशांवर लक्ष, मुलांच्या संस्कारावर लक्ष, असे सगळेच कोपरे साफ करायचे असतात. (सगळ्यांवर लक्ष ठेवायचे) तुम्ही फक्त एकच कोपरा साफ करत राहता. आता बंगल्याचा जर एकच कोपरा झाडत करीत राहिलो आणि सगळ्या कोपऱ्यात केर साचलेला असेल तर कसे होईल? सगळेच कोने-कोपरे साफ करावे लागतात. असे कसे जगू शकाल?
कॉमनसेन्स असलेला मनुष्य घरात कधी मतभेद होऊच देत नाही. पण हे कॉमनसेन्स कुठून आणणार? जर ज्ञानीपुरुषांजवळ बसाल, ज्ञानीपुरुषांची चरणसेवा कराल, तेव्हा कॉमनसेन्स उत्पन्न होईल. कॉमनसेन्सवाला घरात किंवा बाहेर कुठेही भांडण होऊ देत नाही. या मुंबईत मतभेदाशिवायची घरं किती आहेत? मतभेद होत असेल तिथे कॉमनसेन्स कसे म्हणता येईल.
घरात बायको म्हणाली की, 'आत्ता दिवस आहे' आणि तुम्ही म्हणाल की 'नाही आत्ता रात्र आहे' असे म्हणून वाद सुरु केलात तर त्यातून बाहेर कसे पडणार? तुम्ही तिला सांगा की, 'मी तुला विनंती करतो की आत्ता रात्र आहे, जरा बाहेर जाऊन तपास कर ना.' तरीही ती म्हटली की, 'नाही, आत्ता दिवसच आहे.' तेव्हा तुम्ही सांगा, 'यु आर करेक्ट.' माझीच चुकी झाली. असे वागाल तर तुमची प्रगती होऊ शकेल. नाही तर या गोष्टींचा कधी अंतच येणार नाही. हे सगळे वाटसरू आहेत. बायको सुद्धा एक वाटसरूच आहे.