________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
७९
हा असा कसा मोह ?
अब्रू तर त्यास म्हटली जाईल की नागडा फिरला तरीही सुंदर दिसेल! हे तर कपडे घालतात तरी सुंदर दिसत नाही. जाकेट, कोट घालतो, टाय बांधतो तरी बैलासारखा दिसतो! स्वतःला काय समजतात कोण जाणे ?! दुसऱ्या कोणाला विचारतही नाही. बायकोलाही विचारत नाही की, मी नेकटाय घातल्यावर कसा दिसतो म्हणून ! आरशात पाहून स्वत:च ठरवतो की, 'मी खूप छान दिसतो, खूप छान दिसतो' आरशात पाहून केसांच्या पट्टया पाडत जातो! स्त्रिया पण आरशात बघून कुंकू लावतात आणि नखरे करत असतात! ही कसली पद्धत ? ! हे कसले जीवन ? ! स्वतः भगवंत असून हा कसला मूर्खपणा ! स्वतः भगवंत स्वरूप आहे.
कानात हिऱ्यांच्या कुड्या घालतात पण ते स्वतःला दिसतात का ? हे तर लोकांनी हिरे बघावेत म्हणून घालतात. संसाराच्या जाळ्यात अडकलेले आहेत तरीही हिरे दाखवित फिरतात !, अरे, जाळ्यात फसलेल्या माणसाला कसली आली आहे हौस ? झपाट्याने निपटारा करा ना! नवरा सांगत असेल तर नवऱ्याला चांगले वाटण्यासाठी घाला. नवऱ्याने दोन हजारांचे कानातले आणले असेल पण पस्तीस हजाराचे बिल दाखवले तर बायको खुश! कानातले घातलेले डूल स्वतः ला तर दिसत नाहीत. मी शेठाणीला विचारले की कानात घातलेल्या कुड्या रात्री झोपल्यावर झोपेत सुद्धा दिसतात का ? हे तर फक्त मानलेले सुख आहे, चुकीच्या मान्यता आहेत, म्हणून अंतर शांती मिळत नाही. भारतीय नारी कोणाला म्हणतात ? घरात दोन हजारांची साडी असेल तर ती नेसते. हे तर नवरा-बायको बाजारात फिरायला गेले की दुकानातील हजाराची साडी बायकोच्या मनात ठसते. मग त्या साडीसाठी घरी आल्यावर तोंड फुगवून फिरते आणि नवऱ्याशी भांडत बसते. तिला भारतीय नारी कसे म्हणू शकतो ?
... अशा पद्धतीनेही क्लेश टाळला
हिंदू लोक तर मुळचेच क्लेशी ( भांडखोर ) स्वभावाचे म्हणूनच