________________
क्लेश रहित जीवन
काही घेणेही नाही आणि देणेही नाही. जिथे भांडायचे काही कारणच नाही तिथेही भांडायचे?!
आमच्यात आणि हिराबांमध्ये कधीच मतभेद झाले नाहीत. आम्ही त्यांच्या कोणत्याही गोष्टीत कधीच हस्तक्षेप करीत नाही. त्यांच्या हातून पैसे पडले, आम्ही ते पाहिले तरी आम्ही त्यांना असे म्हणणार नाही की, 'तुमचे पैसे पडले.' तुम्ही ते पाहिले की नाही? घराच्या कोणत्याही गोष्टीत आम्ही हस्तक्षेप करीत नव्हतो. त्या पण आमच्या गोष्टीत हस्तक्षेप करायच्या नाही. आम्ही किती वाजता उठतो, किती वाजता अंघोळ करतो, केव्हा येतो, केव्हा जातो, अशा आमच्या कुठल्याही बाबतीत त्या आम्हाला कधीच विचारात नाही. आणि जर एखाद्या दिवशी त्यांनी आम्हाला सांगितले की, 'आज लवकर अंघोळ करा.' तर आम्ही लगेच धोतर मागवून अंघोळीला जायचो. अरे, आम्ही स्वतःच टॉवेल घेऊन अंघोळीला जायचो कारण आम्हाला कळत असे की, 'लाल झेंडा' दाखवित आहे तेव्हा काही तरी कारण असेल, म्हणूनच त्या लवकर अंघोळ करण्यासाठी सांगत आहे, असे आम्ही समजून घ्यायचो. म्हणून तुम्हीही व्यवहाराबद्दल थोडेसे समजून घ्या ना की, कुणालाही कुणात दखल करण्यासारखे नाही.
फौजदाराने पकडले तर तुम्ही तो सांगेल तसे कराल ना? बसवेल तिथे बसाल ना! तुम्हाला समजले की आपण इथे आपले चालणार नाही, इथे आहोत तोपर्यंत झझंट आहे, तसेच हा संसार सुद्धा फौजदारीसारखाच आहे. म्हणून इथेही सरळ वागले पाहिजे.
घरी जेवण मिळते की मिळत नाही? प्रश्नकर्ता : मिळते.
दादाश्री : हवे ते जेवण मिळते, खाट अंथरून देते मग आणखी काय? आणि जर खाट अंथरून दिली नाही तर आपण अंथरून घ्यावी आपणहून तोडगा काढावा. शांतीपूर्वक सगळे समजावून सांगावे लागते.