________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
तुमच्या संसाराच्या हिताहितची गोष्ट काय गीतेत लिहिलेली असेल? ती तर तुम्हालाच समजून घ्यावी लागेल ना?
हसबंड' म्हणजे 'वाईफचीही' 'वाईफ!' (पती म्हणजे पत्नीची पण पत्नी)लोक तर नवरेपणा गाजवायला जाता! अरे, पत्नी कधी पती होणार आहे काय?! पती म्हणजे पत्नीचीही पत्नी. आपल्या घरात जोरात
आवाज निघता कामा नये. हा काय 'लाऊड स्पीकर' आहे का? हा तर इथे इतक्या जोरात ओरडतो की गल्लीच्या टोकापर्यंत ऐकू जाते! घरात 'गेस्ट' (पाहुण्या) प्रमाणे राहा. आम्ही पण घरात गेस्ट प्रमाणेच राहतो. तुम्ही निसर्गाचे पाहुणे आहात इथे जर तुम्हाला सुख वाटले नाही मग सासरी तरी कसे सुख वाटेल?
'मार' दिलात तर बदला घेईल प्रश्नकर्ता : दादा, जेव्हा माझा राग अनावर होतो तेव्हा कित्येक वेळा माझा हात बायकोवर उठतो.
दादाश्री : बायकोला कधीही मारू नये. जोपर्यंत तुमचे शरीर मजबूत असेल तोपर्यंत ती ऐकून घेईल पण नंतर ती तुम्हाला जुमानणार नाही. स्त्री आणि मन या दोघांना मारणे हे संसारात भटकण्याचे दोन साधन आहेत, या दोघांना मारूच नये. त्यांच्याकडून समजावून काम करवून घ्यावे लागते.
माझा एक मित्र होता, जेव्हा जेव्हा मी भेटत असे तेव्हा तो मला बायकोला मारताना दिसत असे, तिचे थोडे जर चुकले की तो मारायचा. नंतर मी त्याला एकांतात समजावून सांगितले की हे जे तू तिला मारतोस पण ती नक्की त्याची नोंद ठेवेल. तू नोंद ठेवणार नाहीस पण ती मात्र मनात नोंदून ठेवेल. अरे, ही तुझी लहान-लहान मुले, जेव्हा तू तिला मारतो तेव्हा ती तुझ्याकडे एकटक बघत असतात. तेही लक्षात ठेवतील आणि मोठी झाल्यावर ती मुले आणि त्यांची आई, दोघे मिळून तुझा सूड घेतील. कधी? जेव्हा तुमची गात्रे ढिली पडतील तेव्हा. म्हणून बायकोला