________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
१०१
तो भागाकार करत असेल तर आपण गुणाकार करावा म्हणजे रक्कम उडून जाईल. समोरच्या माणसाने मला असे केले, तसे केले हाच अपराध आहे. रस्त्यात जाताना जर भिंतीशी टक्कर झाली तर का रागवत नाही? झाडाला 'जड' का म्हटले आहे? जी आदळतात ती सगळी हिरवी झाडेच आहेत ! गायीचा पाय आपल्या पायावर पडला तर आपण तिला काही बोलतो का? असेच याही लोकांचे आहे. 'ज्ञानी पुरुष । सगळ्यांना कशामुळे माफ करतात? ते जाणतात की या बिचाऱ्यांना काही समजत नाही, झाडासारखे आहेत. आणि समजदार व्यक्तीला तर सांगावेच लागत नाही, तो तर लगेच प्रतिक्रमण करुन घेतो.
समोरच्याचा दोष बघूच नये, त्यामुळे तर आपला संसार बिघडून जातो. स्वत:चेच दोष पाहत राहावेत. आपल्याच कर्माच्या उदयाचे हे फळ आहे ! म्हणून आणखी काही जास्त संगण्याची गरजच राहिली नाही ना?
सगळे एकमेकांना दोष देतात की 'तुम्ही असे आहात. 'तुम्ही तसे आहात.' आणि एकत्र बसून टेबलावर जेवतात. अशाप्रकारे आत वैर बांधले जाते. या वैरमुळे जग टिकून राहिले आहे. म्हणून आम्ही सांगितलेले आहे की, 'समभावे निकाल करा.' त्यामुळे वैर संपते.
सुख घेण्यात फसवणूक वाढली संसारी मिठाईत काय आहे? अशी कोणती मिठाई आहे का की जी थोडा वेळ तरी टिकते? जास्त खाल्ली तर अजीर्ण होते, कमी खाल्ली तर (खाण्याची) लालूच उत्पन्न होत राहते. जास्त खाल्ली तर आत त्रास होतो. सुख असे पाहिजे की त्यापासून कसलाच त्रास होता कामा नये. पाहा ना, या दादांना, यांच्याकडे आहेच ना असे सनातन सुख!
सुख मिळावे म्हणून लोक लग्न करतात. पण उलट त्यामुळे जास्त फसगत झाल्यासारखे वाटते. मला कोणी मदत करणारा मिळावा.