________________
क्लेश रहित जीवन
कधीच मारु नये. मारल्याने तर उलट तुम्हालाच खूप नुकसान होत असते, खूप अंतराय निर्माण होतात.
१००
आश्रित कोणाला म्हणतात ? खुंटीला बांधलेली गाय असेल तिला मारले तर ती कुठे जाईल ? घरातील माणसे तर खुंटीला बांधल्यासारखे आहेत त्यांना मारले तर आपणच नालायक म्हटले जाऊ. त्यांना सोड आणि मग मार, तेव्हा ते तुलाच मारतील किंवा पळून जातील. बांधलेल्यांना मारणे हे शुरवीरांचे काम कसे म्हणू शकतो ? हे तर भित्र्यांचे काम म्हटले जाईल.
घरातील माणसांना तर किंचितही दुःख देता कामा नये. ज्याच्यात समजदारी नसेल तेच घरच्यांना दुःख देतात.
तक्रार नाही, तोडगा काढा
प्रश्नकर्ता : दादा, माझी तक्रार कोण ऐकेल ?
दादाश्री : तू तक्रार करशील तर तूच गुन्हेगार ठरशील. मी तर जो तक्रार करायला येतो त्यालाच गुन्हेगार मानतो. तुला तक्रार करण्याची वेळच का आली? तक्रार करणारे बहुतेक गुन्हेगारच असतात. स्वतः गुन्हेगार असेल तर तक्रार करायला येईल. तू तक्रार करशील तर तू तक्रारदार बनशील आणि समोरचा आरोपी बनेल. म्हणून त्याच्या (समोरच्याच्या) दृष्टीत तू आरोपी ठरशील. म्हणून कुणाविरुद्ध तक्रार करू नये.
प्रश्नकर्ता : मग मी काय करायला हवे ?
दादाश्री : 'ते' चुकीचे वाटले तर मनात म्हणावे की, ते खूप सज्जन आहेत, तूच चुकीची आहेस. अशाप्रकारे आपल्याकडून गुणाकार झाला असेल तर भागाकार करावा आणि भागाकार झाला असेल तर गुणाकार करावा. हे गुणाकार, भागाकार करायला का शिकवतो ? तर संसारातून तोडगा सुटण्यासाठी.