________________
क्लेश रहित जीवन
प्रश्नकर्ता : स्त्रीचे डिपार्टमेंट कोणते? पुरुषांनी स्त्रियांच्या कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये हात घालू नये?
दादाश्री : असे आहे, स्वयंपाक काय करावा, घर कसे चालवावे, ते सर्व स्त्रीचे डिपार्टमेंट आहे. ती गहू कुठून आणते, कुठून आणत नाही ते तुम्हाला जाणून घ्यायची काय गरज? ती स्वत:हून सांगत असेल की गहू आणण्यात मला अडचण येत आहे तर वेगळी गोष्ट पण ती काही विचारत नसेल, रेशनचे काही सांगत नसेल, मग आपल्याला त्या डिपार्टमेंटमध्ये ढवळाढवळ करण्याची गरजच काय? आज खीर बनव, आज जिलबी बनव, हे सुद्धा आपल्याला सांगण्याची काय गरज? वेळ येईल तेव्हा ती बनवेल. तिचे ते स्वतंत्र डिपार्टमेंट! एखाद्या वेळेस खूपच इच्छा झाली तर म्हणावे की 'आज लाडू बनव' असे सांगण्यास मी मनाई करत नाही, पण दुसरे वेडेवाकडे बोलणे, विनाकारण आरडओरडा करणे, कढी खारट झाली, खारट झाली, हा सर्व मूर्खपणा आहे.
ही रेल्वेलाईन चालते, त्यात किती सारे कार्य पार पाडले जातात! किती ठिकाणांहून नोंदी येतात, संदेश येतात, हे सगळे 'डिपार्टमेंट' वेगळे आहेत. आता त्यात सुद्धा त्रूटी तर राहतातच ना? तसेच बायकोच्याही डिपार्टमेंटमध्ये कधीतरी त्रूटी राहते. आपण जर त्यांच्या चुका काढायला गेलो तर त्या पण आपल्या चुका काढतील. तुम्ही असे करत नाही, तसे करत नाही. असे पत्र आले आणि त्यावेळी तुम्ही असे केले. म्हणजे ती सूड घेते. मी तुमच्या चुका काढल्या तर तुम्ही पण माझ्या चुका काढण्यासाठी तयारच असता! तेव्हा शहाणा माणूस घरच्या गोष्टीत ढवळाढवळ करीत नाही. त्याला पुरुष म्हणायचे. नाहीतर तो बायकांसारखा असतो. कित्येक माणसे तर स्वयंपाक घरात जाऊन तिखटाचा डबा उघडून पाहतील आणि म्हणतील की दोन महिन्यांपूर्वीच तिखट आणले होते आणि एवढ्यात संपले पण? अरे, तिखट बघत बसलास तर तू यातून केव्हा पार पडशील? ज्याचे हे डिपार्टमेंट (काम) आहे तिला काळजी नसेल का? कारण वस्तू तर वापरलीही जाते आणि आणलीही जाते. पण