________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
स्त्रियांचा अपमान झाला तर त्या आयुष्यभर विसरत नाही थेट 'तिरडी' निघेपर्यंत त्या आठवणी ताज्याच असतात! त्या आठवणी जर विसरता आल्या असत्या तर हे जग केव्हाच संपुष्टात आले असते! पण असा विसर पडत नाही, म्हणून सावध राहा. प्रत्येक काम सावधानीपूर्वक करण्यासारखे आहे!
'स्त्रीचारित्र्य' म्हटले जाते ना? ते समजेल असे नाही. तरी पण स्त्रिया देवी सुद्धा आहेत! असे आहे की, तुम्ही त्यांना देवीच्या रूपाने पाहिले तर तुम्ही देवता व्हाल. बाकी तुम्ही तर कोंबड्यासारखे राहता, हत्ती आणि कोंबड्यासारखे! बघा, हत्तीभाऊ आलेत आणि कोंबडेभाऊ आलेत! लोकांना राम व्हायची इच्छा नाही आणि घरात सीताजींना शोधतात! अरे वेड्या, राम तर तुला नोकरीतही ठेवणार नाही. यात पुरुषांचाही दोष नाही. तुम्हाला स्त्रियांसोबत 'डीलिंग' (व्यवहार) करता येत नाही.
तुम्हा व्यापाऱ्यांना गिहाईकांसोबत डीलिंग करता आले नाही तर गिहाईक तुमच्याकडे येणार नाहीत. म्हणून आपले लोक म्हणतात की सेल्समन चांगला ठेवा. चांगला, देखणा, हुशार 'सेल्समन' असेल तर लोक थोडे जास्त पैसे द्यायलाही तयार होतात. अशाप्रकारे आपल्याला स्त्रीसोबत डीलिंग करता आले पाहिजे. स्त्रीला एका डोळ्याने देवी प्रमाणे पाहा आणि दुसऱ्या डोळ्याने तिचे स्त्रीचारित्र्य पाहा. एका डोळ्यात प्रेम
आणि दुसऱ्या डोळ्यात सक्ती ठेवली तरच समतुलन राहील. फक्त देवी म्हणून पाहाल आणि आरती करत बसाल तर ती चुकीच्या मार्गावर चालेल, म्हणून समतुलन ठेवा.
व्यवहाराला याप्रकारे समजून घ्या पुरुषांनी स्त्रियांच्या बाबतीत हात घालू नये आणि स्त्रियांनी पुरुषांच्या बाबतीत हात घालू नये. प्रत्येकाने आपापल्या डिपार्टमेंटमध्ये राहावे.