________________
क्लेश रहित जीवन
घोडीवर बसता येत नाही, आणि वरुन घोडीची खोडी काढतो म्हणून घोडी उधळते, कारण तिला तशी सवयच नसते ना! आणि तेव्हा तो बावळट खाली पडतो! पण मग तो भाऊ लोकांना काय सांगतो की, 'घोडीने मला खाली पाडले.' मग ती घोडी स्वतःचा न्याय कोणाला सांगायला जाईल? घोडी वर बसणे तुला जमत नाही त्यात तुझा दोष की घोडीचा? आणि तो बसताच घोडी सुद्धा समजून जाते की, हा तर जंगली प्राणी बसला, याला बसता येत नाही! त्याचप्रमाणे या हिंदुस्तानी स्त्रिया म्हणजे आर्यनारी, त्यांच्याशी जुळवून घेता आले नाही मग त्या पाडणारच ना? एकदा का नवरा बायकोच्या विरोधात गेला तर त्याचा प्रभावच राहत नाही. आपला संसार चांगल्या प्रकारे चालत असेल, मुले चांगल्या पद्धतीने शिकत असतील, काहीच भानगड नसेल तरीही तुम्हाला बायकोच्या चुका दिसल्या आणि विनाकारण बायकोला रागावले म्हणजे बायकोला तुमच्या अकलेचा अंदाज येऊन जातो की याच्यात काही बरकत नाही.
९४
जर तुमचा प्रभाव नसेल, पण तुम्ही घोडीला प्रेमाने कुरवाळले तरीही तिचे प्रेम तुम्हाला मिळेल. प्रथम प्रभाव पडला पाहिजे. बायकोच्या काही चुका तुम्ही सहन केल्या तर तिच्यावर प्रभाव पडतो. आणि चूक नसताना देखील चुका काढत राहिलात तर काय होईल? काही पुरुष स्त्रियांच्या बाबतीत तक्रार करीत राहतात, त्या सर्व चुकीच्या तक्रारी असतात. काही साहेब असे असतात की ऑफिसातील कर्मचाऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करतात. तेव्हा सगळ्या कर्मचाऱ्यांना कळून चुकते की साहेबात काही दम नाही. पण काय करतील ! पुण्याच्या जोरावर तो बाँस झालेला आहे. घरात बायकोशी पंधरा-पंधरा दिवस भांडण चालू असते ! साहेबांना विचारले, 'का असे ?' तर म्हणेल की, 'तिला अक्कलच नाही.' आणि हा तर खूप अक्कलवाला ! विकायला झाल तर चार आणे सुद्धा कोणी देणार नाही ! साहेबाच्या बायकोला विचारले तर ती म्हणेल की, 'जाऊ द्या ना त्यांच्या बद्दल बोलण्यात काही अर्थ नाही. त्यांच्यात काही दमच नाही !'