________________
क्लेश रहित जीवन
नाही, मुलीचे बाप होणे जमत नाही. बायकोचा नवरा होणे जमत नाही. जीवन जगण्याची कलाच माहीत नाही. सुख हाताशी असताना देखील सुखाचा उपभोग घेऊ शकत नाही.
प्रश्नकर्ता : पण घरात भांडी तर वाजतीलच ना?
दादाश्री : रोज-रोज भांडी वाजली (भांडणं झाली) तर कसे चालेल? पण हे तर त्याला समज नसल्यामुळे होत असते. जो जागृत असेल त्याला तर एक जरी मतभेद झाला तरी रात्रभर झोप लागत नाही! या भांड्यांना (माणसांना) तर स्पंदन आहेत. म्हणून रात्री झोपता-झोपता देखील ही स्पंदने चालूच असतात की, 'हा तर असाच आहे, वाकडाच आहे, उलट्या डोक्याचा आहे, नालायक आहे, याला हाकलून लावण्यासारखे आहे !' आणि त्या भांड्यांना अशी काही स्पंदने होतात का? आपले लोक समजल्याशिवायच हो ला हो करतात, आणि म्हणतात की दोन भांडी एकत्र आली की वाजतीलच! अरे, मूर्खा वाजायला आपण काय भांडी आहोत? या दादांना कधी कोणी वाजताना (भांडताना) पाहिलेले नाही! स्वप्नात देखील असे आले नसेल!! वाजण्याचे कारणच काय? हे सर्व पूर्णपणे आपल्या स्वत:च्या जोखीमदारीवर आहे, चहा लवकर मिळाला नसेल तर आपण टेबलावर रागाने तीनदा जोराने हात आपटतो, ती जबाबदारी कोणाची? यापेक्षा आपण बावळटासारखे बसून राहायचे. चहा मिळाला तर ठीक, नाही तर असेच ऑफिसला जाऊ! त्यात काय चुकीचे? चहाचीही काही वेळ तर असेलच ना? हे जग नियमाच्या बाहेर तर नसेलच ना? म्हणून आम्ही सांगितले की व्यवस्थित'! वेळ झाली की चहा आपोआप मिळेल, तुम्हाला टेबल ठोकण्याची गरज पडणार नाही. तुम्ही स्पंदने पाठवली नाही तरी स्वतःहून मिळेल, आणि स्पंदन उभे केलेत तरीही मिळेल. पण स्पंदन केल्यामुळे तुमच्या बायकोच्या हिशोबवहीत हे नोंदले जाईल की, त्यादिवशी तुम्ही असे टेबल ठोकले होते!