________________
क्लेश रहित जीवन
आहे. आम्ही काय सांगू इच्छितो की, सर्वकाही करा, पण वास्तविकता काय आहे ते आधी नीट समजून घ्या. !
भरत राजा तेराशे राण्यांसोबत आयुष्यभर राहिले आणि त्याच जन्मात मोक्षाला गेले! तेराशे राण्यासोबत!!! म्हणून हकीगत समजून घेण्याची गरज आहे. समजून संसार करा, संन्याशी होण्याची गरज नाही. जर हे समजले नाही तर संन्याशी होऊन एका कोपऱ्यात पडून राहा. संन्याशी तर, संसारात ज्याचे स्त्रीसोबत जमत नाही तोच संन्याशी बनतो. आणि स्त्रीपासून दूर राहू शकतो की नाही, अशी शक्ती प्राप्त करण्याची ती एक कसरत आहे.
संसार तर टेस्ट एक्झामिनेशन आहे. तिथे टेस्टेड व्हायचे आहे. लोखंड सुद्धा टेस्टेड झाल्याशिवाय चालत नाही, मग मोक्षात अनटेस्टेड चालू शकेल का?
___ म्हणून मूर्छित होण्यासारखे हे जग नाही. मुर्छमुळे हे जग असे दिसते आणि मार खात-खात माणूस मरतो. भरत राजाला तेराशे राण्या होत्या, त्याची अवस्था काय होत असेल? इथे घरात एकच राणी असते तरीही ती तुमची सारखी फजिती करत असते, मग तेराशे राण्यांबरोबर कसे काय निभावणार? अरे, एका राणीचे मन जिंकायचे असेल तरी खूप कठीण जाते! जिंकूच शकत नाही. कारण की मतभेद झाले की पुन्हा बसलेले विस्कटते! भरत राजाला तर तेराशे राण्यांबरोबर निभावयाचे होते. राणीवासातून नुसता फेरफटका मारला तरी पन्नास राण्यांची तोंडे फुगलेली असणार! अरे, कित्येक तर राजाला मारुन टाकण्याच्या तयारीत असत. मनात विचार करत असत की निवडक राण्याच त्यांच्या आवडत्या आणि आम्ही मात्र परक्या! म्हणून काहीतरी मार्ग काढायला हवा. राजाला मारण्यासाठी काहीतरी करायला हवे, आणि तेही त्या राण्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी! त्यांचा द्वेष राजावर नव्हता पण त्या राण्यांवर होता. पण असे करताना राजा तर मरेलच आणि तू सुद्धा विधवा होशील त्याचे