________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
जिथे मतभेद आहे तिथे अंशज्ञान आहे आणि जिथे मतभेदच नाही तिथे विज्ञान आहे. जिथे विज्ञान आहे तिथे सर्वांश ज्ञान आहे. सेंटरमध्ये (केंद्रस्थानी) बसलो तर मतभेदच उरत नाही. तेव्हाच मोक्ष (संभव) होतो. पण डिग्रीवर बसलो आणि 'आमचे-तुमचे' होत असेल तर मोक्ष होऊ शकत नाही. निष्पक्षपाती असेल त्याचा मोक्ष होतो.
समकितीची ओळख काय? तर म्हणे, घरातील सगळेजण उलट करीत असतील तरीही त्याला सुलट करून टाकतो. प्रत्येक बाबतीत सुलट करणे ही समकितीची निशाणी आहे. एवढेच ओळखायचे आहे की ही 'मशिनरी' कशी आहे, त्याचा फ्यूज उडाला तर त्यास कसा बसवावा. समोरच्या व्यक्तीच्या प्रकृतीस्वभावाला एडजस्ट होता आले पाहिजे. आम्हाला तर समोरच्याचा फ्यूज उडाला असेल तरी एडजस्ट होता येते. पण समोरच्याचे एडजस्टमेन्ट तुटले तर काय होईल? फ्यूज गेला मग तो भिंतीवर आपटतो. पण वायर तुटत नाही. मग जर कोणी फ्यूज बसवून दिला तर पुन्हा पूर्ववत होतो, नाहीतर तोपर्यंत गोंधळतो.
___ संसार आहे म्हणून घाव तर पडणारच ना? आणि बाईसाहेब पण म्हणतील की आत घाव भरुन निघणार नाही. पण मग संसारात पडल्यानंतर पुन्हा घाव भरुन निघतो. मूर्छितपणा आहे ना! मोहामुळे मूर्छितपणा आहे. मोहामुळे घाव भरून निघतात. जर घाव भरुन निघाले नसते तर वैराग्यच आले असते ना?! मोह कशास म्हणतात? तर खूप अनुभव झाले असतील तरी पुन्हा सगळे विसरतो. घटस्फोट घेतेवेळी निश्चित करतो की आता पुन्हा कोणत्याही स्त्रीशी लग्न करणार नाही, तरी देखील पुन्हा धाडस करतो!
....ही तर कशी फसवणूक? लग्न केले नाही तर जगाचा समतोल कसा राहील? कर ना लग्न. खुशाल लग्न करा. 'दादांना' त्याची हरकत नाही पण हरकत अज्ञानतेची