________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
टाकत राहिले (त्रास देत राहिले) त्याला तुम्ही सुलट करत राहिलात तर प्रश्न सुटले. उलट करणे हाच लोकांचा स्वभाव आहे. तू समकिती असशील तर लोक उलटे करीत असतील तरी तू सुलट करत राहा. आपण चुकूनही उलट करू नये. बाकी, जग तर रात्रभर नळाला चालू ठेवून मडक्याला पालथे करून ठेवेल असे आहे ! स्वतःचेच सर्वस्व बिघडवत आहे. त्याला असेच वाटते की, मी लोकांचे बिघडवत आहे. लोकांचे बिघडवू शकेल असा कोणी नाहीच मुळी, असा कोणी जन्माला आलेलाच नाही.
हिंदुस्तानात कोणाची प्रकृती (स्वभाव) ओळखता येतच नाही, इथे तर देव सुद्धा गोंधळून जातील! 'फॉरेन मध्ये' तर एक दिवस बायकोशी एकनिष्ठ राहिला तर आयुष्यभर एकनिष्ठ राहिल. आणि इथे तर प्रकृतीचे दिवसभर निरीक्षण केले तरी निष्कर्ष काढता येणार नाही. इथे तर कर्माच्या उदयामुळे नुकसान होत असते, नाही तर हे लोक नुकसान करून घेतील असे आहेत का ? अरे, मेले तरी नुकसान होऊ देणार नाही. आत्म्याला थोडा वेळ बाजूला बसवतील आणि मग मरतील.
काय ?
८७
शब्द बदलून मतभेद टाळला
दादाश्री : जेवताना मतभेद होतात का ?
प्रश्नकर्ता : मतभेद तर होणारच ना !
दादाश्री : का? लग्न करतेवेळी असा करार केला होता की
प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : त्यावेळी तर असा करार केला होता की, समय वर्ते सावधान (शुभ मंगल सावधान) घरात बायकोसोबत 'तुमचे आणि आमचे' अशी वाणी निघता कामा नये. वाणी विभक्त असायला नको, वाणी अविभक्त असायला हवी. आपण संयुक्त कुटुंबातले ना ?