________________
क्लेश रहित जीवन
क्लेश रहित जीवन जगणे हाच (खरा) धर्म आहे. हिंदुस्तानात, इथे या संसारातच स्वतःचे घर स्वर्गासारखे झाले तरच मोक्षाची गोष्ट करावी, नाही तर मोक्षाबद्दल बोलूच नये, अगदीच स्वर्ग नाही पण स्वर्गाच्या जवळपासचे तरी झाले पाहिजे ना? क्लेशरहित झाले पाहिजे, म्हणून शास्त्रकार म्हणतात की 'जिथे किंचितमात्र क्लेश आहे तिथे धर्म नाही.' जेलमध्ये राहावे लागले तरी 'डिप्रेशन' नाही आणि राजवाड्यात राहावे लागले तरी ‘एलिवेशन' नाही, असे असले पाहिजे. क्लेश रहित जीवन झाले म्हणजे मोक्षाच्या जवळपास आला, म्हणून तो या जन्मात सुखी होणारच. मोक्ष प्रत्येकालाच हवा आहे. कारण बंधन कुणालाही आवडत नाही. परंतु क्लेश रहित झालो तर समजावे की आत्ता आपल्या मोक्षाचे स्टेशन जवळ आले आहे.
तरी पण आपण सुलट करावे एका वाणी गृहस्थाला मी विचारले, 'तुमच्या घरात भांडणे होतात का?' तेव्हा तो म्हणाला, 'खूप होतात.' मी विचारले, मग त्यावर तू काय उपाय करतोस?' तेव्हा तो वाणी म्हणाला, 'सर्व प्रथम तर मी घराचे दरवाजे बंद करतो.' मी विचारले, 'सर्व प्रथम दरवाजे बंद करण्यामागचा हेतू काय?' त्यावर तो वाणी म्हणाला, 'भांडण बघून लोक घरात घुसले तर उलट भांडण वाढतील. घरात भांडल्यानंतर वातावरण आपोआप शांत होते.' याची बुद्धी बरोबर आहे, मला हे पटले. एवढी जरी समजदारीची गोष्ट असेल तर ती आपण स्वीकारावी. एखादा भोळा माणूस तर दरवाजा बंद असेल तर उलट त्याला आणखी उघडून येईल. आणि लोकांना म्हणेल, 'या, पाहा आमच्या घरी हे असे आहे! अरे! हे तर तू जास्त तमाशा केलास!'
मारामारी करतात त्यात दुसऱ्या कोणाची जबाबदारी नाही, आपली स्वतःचीच जबाबदारी आहे. याला तर स्वत:लाच वेगळे करावे लागते! जर तुम्ही खरोखर हुशार व्यक्ती असाल तर लोक कितीही उलट