________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
आपटून ठेवेल आणि कुरकुर करेल की नाही? बायको सुद्धा लगेच समजून जाते की कुरकुर करत आहे म्हणून. हे क्लेशमय जीवन आहे.
। क्लेशरहित घर जणू देऊळच जिथे क्लेश असतो तिथे भगवंत वास करीत नाही, म्हणून आपण भगवंताला सांगावे, ‘साहेब तुम्ही मंदिरातच राहा, माझ्या घरी येऊ नका! आम्ही पुष्कळ मंदिरे बांधू, पण घरी येऊ नका! जिथे क्लेश नसतो तिथे भगवंताचा वास नक्कीच असतो, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि क्लेशाला आपण बुद्धी आणि योग्य समज वापरुन मीटवू शकतो. मतभेद टळू शकतील इतकी जागृती प्रकृती गुणानेही येऊ शकते. इतकी बुद्धी पण येऊ शकेल असे आहे. 'जाणले' त्यास म्हणतात की ज्यामुळे कुणाशीही मतभेद होत नाहीत. मती पोहोचत नाही म्हणून मतभेद होतात. मती पूर्णपणे पोहोचली तर मतभेद होणार नाही, मतभेद म्हणजे संघर्ष, तोच कमकुवतपणा आहे.
काही भानगड झाली तर चित्त थोडा वेळ स्थिर ठेवा आणि शांतपणे विचार करा म्हणजे तुम्हाला आतूनच सुचेल. क्लेश झाला म्हणजे देव निघून जाणार की नाही?
प्रश्नकर्ता : निघून जातील.
दादाश्री : काही लोकांच्या घरातून देव कधीच जात नाही पण भांडणे होऊ लागली तर म्हणतात, 'चला आता निघूया, आपल्याला इथे जमणार नाही.' क्लेशमय घरात राहायला मला आवडणार नाही म्हणून मग देरासरात आणि मंदिरात जातात. या मंदिरात देखील क्लेश करतात. मुकुट, दागिने घेऊन जातात तेव्हा देव म्हणतात की आता इथूनही निघूया. देवांना सुद्धा या सगळ्यांचा वीट आला आहे. इंग्रजांच्या वेळी म्हणत असत ना की,
'देव गया डुंगरे, पीर गया मक्के.'