________________
क्लेश रहित जीवन
म्हणतात हिंदू लोकांचे संपूर्ण आयुष्य भांडणातच संपून जाते; पण मुसलमान असे पक्के की ते बाहेर भांडून येतील पण घरात बायकोशी भांडत नाहीत. आता कित्येक मुस्लिम देखील हिंदुच्या सहवासात राहून बिघडले आहेत. पण या बाबतीत मला हिंदूंपेक्षा मुस्लीम जास्त समजदार वाटले. अरे कित्येक मुसलमान तर बायकोला झोपळ्यावर झोके देखील देतात. आमचा कॉन्ट्रॅक्टचा धंदा, म्हणून आमचे मुसलमानांच्या घरी जाण्याचेही होत असे, आम्ही त्यांच्या घरातील चहाही प्यायचो! आम्ही कुणाशीही भेदभाव करीत नाही. एक दिवस मी मुसलमानाच्या घरी गेलो होतो, तेव्हा मियाँसाहेब बायकोला झोके देऊ लागले ! म्हणून मी त्यांना विचारले की, 'तुम्ही तिचे असे लाड केलेत तर ती तुमच्या डोक्यावर नाही का बसणार? त्यावर ते म्हणाले ती कशी डोक्यावर बसेल? तिच्याजवळ काही हत्यार नाही. मी म्हटले की, आमच्या हिंदु लोकांना तर भीती वाटते की असे केल्याने जर बायको डोक्यावर बसली तर काय करायचे? म्हणून आमचे लोक बायकोला झोके वगैरे घालत नाही. तेव्हा मियाँभाई म्हणाले, 'मी झोके का घालतो ते माहीत आहे का? माझ्याकडे दोनच खोल्या आहेत, माझा काही बंगला नाही, फक्त या दोनच खोल्या त्यात जर बायकोशी भांडलो तर मी कुठे झोपणार?' माझी सारी रात्र बिघडेल. म्हणून मी बाहेर सगळ्याशी भांडून येतो पण बायकोशी भांडत नाही. बीबी मियांना विचारते, ‘सकाळी मटण आणायचे सांगितले होते ना मग का आणले नाही? तेव्हा मियाँभाई रोख उत्तर देतो की, 'उद्या आणेल.' मग दुसऱ्या दिवशी सांगतो आज तर नक्कीच आणेल. तरीही संध्याकाळी रिकाम्या हाती येतो, तेव्ही मग बायको खूप चिडते, पण मियाँसाहेब तर फार हुशार, तो म्हणतो 'यार मेरी हालत मै जानता हूं!' असे काहीतरी बोलून बायकोला खुश करतो. पण भांडत नाही! आणि आपले लोक काय म्हणतील? 'तू कोण माझ्यावर दडपण करणारी?' 'जा, मी नाही आणणार.' अरे, असे बोलू नये. उलट तुझेच बळ कमी होते. तू असे बोलतो म्हणून तूच दडपणा खाली आहेस. अरे, ती तुला कशी दडपणाखाली आणू शकते? ती बोलते तेव्हा शांत राहायचे, पण