________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
ওও
हे विज्ञान तर खूप मोठे 'सायन्स' आहे. मी जे सांगतो ते फार सूक्ष्म सायन्स आहे. संपूर्ण जग निमित्ताचाच चावा घेतो.
नवरा-बायको हे जग खूप मोठे, विशाल आहे; परंतु हे जग स्वत:च्या खोलीत आहे इतकेच मानून घेतले आहे. आणि तिथेही जर जग मानत असेल तरीही ठीक. पण तिथेही बायको सोबत लढाई करतो! अरे, हे काय तुझे पाकिस्तान नाही?
हेच नवरा-बायको जेव्हा शेजाऱ्यांशी भांडत असतील तेव्हा दोघेही एकजूट होतात. शेजाऱ्याला म्हणतील की, 'तुम्ही असे आहात आणि तुम्ही तसे आहात.' आपल्याला वाटते की नवरा-बायकोच्या जोडीत किती अभेदता आहे, यांना तर नमस्कार करावा अशी जोडी आहे. नंतर घरात बघितले तर बायकोकडून चहात साखर थोडी कमी पडली असेल तर नवरा म्हणेल की, 'तुला किती वेळा सांगायचे साखर जरा जास्त टाकत जा पण तुझे डोके जाग्यावर असेल तर ना?' अरे, पण तुझे डोके तरी कुठे जाग्यावर आहे ? कसला रे असा माणूस तू? जिच्यासोबत आयुष्य खपवायचे तिच्याशीच भांडायचे?
तुमचा कुणाशी मतभेद होतो का? प्रश्नकर्ता : हो, होतो, बऱ्याचदा होतो. दादाश्री : बायकोबरोबर मतभेद होतो का? प्रश्नकर्ता : हो बऱ्याचदा होतो.
दादाश्री : बायकोबरोबर देखील मतभेद होतो? तिथेही एकता नसेल मग कुठे असणार? एकता म्हणजे काय, की कधीही मतभेद होत नाहीत. या एका व्यक्तीच्या बाबतीत निश्चय केला पाहिजे की तुमच्यात आणि माझ्यात मतभेद होता कामा नये. अशी एकता असायलाच हवी. अशी एकता केली आहे का तुम्ही?