________________
[४]
फॅमिली ओर्गेनायझेशन
हे कसले 'आयुष्य'? फॅमिली ओर्गेनायझेशन (कुटंब व्यवस्था) चे काही ज्ञान आहे का तुमच्याजवळ? आपल्या भारतात 'कुटुंब कसे चालवावे' याचे ज्ञान फार कमी आहे. विदेशात तर ते फॅमिली वगैरे काही मानतच नाहीत. जेम्स वीस वर्षाचा झाला म्हणजे त्याचे आई-वडील विलियम आणि मेरी जेम्सला म्हणतील की तू तुझे बघ आणि आम्ही दोघे पोपट आणि पोपटीन आमचे बघून घेऊ! (तू वेगळा आणि आम्ही दोघे वेगळे ) त्यांना कुटुंब व्यवस्था सांभाळायची जास्त सवयच नाही. त्यांच्या कुटुंबात सरळ स्पष्ट बोलून टाकतात. मेरी आणि विलियमचे पटले नाही तर लगेच घटस्फोट घेऊन मोकळे होतात! आपल्या इथे आजून लगेच डायवोर्सच्या निर्णयापर्यंत पोहोचत नाही. आपल्या इथे तर कायम सोबतच राहायचे. रोज भांडण करायचे आणि परत त्याच खोलीत झोपायचे!
जीवन जगण्याचा हा (योग्य) मार्ग नाही. याला फॅमिली लाईफ (कौटुंबिक जीवन) म्हणत नाही. अरे! आपल्या इथल्या म्हाताऱ्या आजींना जीवन जगण्याचा मार्ग विचारला तर त्या सांगतील की, 'आरामशीर खा, प्या, घाई कसली आहे ?' माणसाच्या प्राथमिक गरजा कोणत्या आहेत, आधी त्या नीट ओळखून घ्याव्यात. त्या सोडल्या तर बाकी सर्व अनावश्यक गोष्टी आहेत. या अनावश्यक गोष्टीच माणसाच्या जीवनात अडचणी आणतात. आणि मग झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात!