________________
क्लेश रहित जीवन
होते त्यांनी त्यांच्या बायकोला हाक मारली, 'अरे बाळाची आई कुठे गेली ?' मग बाळाची आई आतून बोलते 'काय काम आहे ?' तेव्हा भाऊ म्हणतात ‘इकडे ये, लवकर ये, लवकर ये, बघ, तुझ्या बाळाला ! कसा पराक्रम करतोय ते बघ तरी !! बाळाने पाय उंच करून माझ्या खिशातून कसे दहा रुपये काढले ! कसा हुशार झाला आहे बाळ !'
३४
अरे मूर्खा, असा कसा रे तू निपजलास ! बाप झाला आहेस! लाज नाही का वाटत? या बाळाला कसले प्रोत्साहन मिळाले ते समजले का तुला ? मुलाला वाटेल की आपण खरोखर खूप मोठा पराक्रम केला ! कौतुक करण्यासारखे केले! हे असे शोभते का ? काही तरी नियम हवेत का नकोत? या हिंदुस्तानाचे मनुष्यपण असे लूटले गेले तर शोभेल का ? काय बोलले तर मुलाला चांगले उत्तेजन मिळेल आणि काय बोलले तर त्याचे नुकसान होईल, हे तुम्हाला समजायला नको का ? 'अनटेस्टेड फादर' आणि ‘अनटेस्टेड मदर' आहात. बाप मुळा आणि आई गाजर, तर मग सांगा मुले कशी असतील ? सफरचंद थोडेच बनतील ? !
प्रेमाने वागा - मुले सुधरतीलच
एक बाप त्याच्या मुलाला काहीतरी टाकून बोलला, मग मुलगा खूप चिडला, आणि बापाला म्हणू लागला, 'तुमचे आणि माझे जमणार नाही.' तेव्हा बाप मुलाला म्हणाला, 'मी तुला अजिबात खराब बोललेलो नाही, तू एवढा कशाला चिडतोस ? तेव्हा मी त्या बापाला म्हणालो, आता कशाला मलमपट्टी करतोस ? प्रथम तू त्याला चिडण्यासारखे बोललासच का? कोणालाही डिवचू नका. ही पिकलेली फळे आहेत. नाजूक आहेत. म्हणून काही बोलूच नका. 'मेरी भी चूप आणि तेरी भी चूप. खा-प्या आणि मजा करा.
,
प्रश्नकर्ता : ही मुले वाईट मार्गाला गेलीत तर त्यांना योग्य मार्गाला आणावे हे आई-वडिलांचे कर्तव्य नाही का ?