________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
ब्रम्हदेवाच्या एका दिवसाइतकेच जगायचे आहे, मग कशाला एवढा वैताग? ब्रम्हदेवाच्या शंभर वर्षाएवढे जगायचे असेल तर आपण समजू शकतो की ठीक आहे, मग आपण कशाला एडजस्ट व्हायचे? खटला चालव असे सांगू. पण ज्याला संसार चक्रातून लवकर सुटायचे असेल, त्याला काय करावे लागेल? एडजस्ट व्हायचे की मग खटला चालव असे सांगायचे? आपल्याला तर एकच दिवस काढायचा आहे, आणि लवकर आवरते घ्यायचे आहे. जे काम लवकर संपवायचे असेल मग त्यासाठी काय करावे लागेल? 'एडजस्ट' होऊन थोडक्यात मिटवायचे, नाहीतर ते लांबतच जाईल. हो की नाही?
बायकोशी भांडलात तर रात्री झोप लागेल का? आणि सकाळी नाश्ता पण चांगला मिळत नाही.
आम्ही या संसाराचे खूप सूक्ष्म संशोधन केले आहे. अगदी अंतिम प्रकारचे संशोधन करून या सर्व गोष्टी सांगत आहोत! व्यवहारात कसे वागावे हे पण सांगतो आणि मोक्षला जाण्यासाठी काय करावे तेही सांगतो. तुमच्या अडचणी कमी कशा होतील हे समजावणे हाच आमचा उद्देश आहे.
घरातले वर्चस्व सोडावेच लागेल ना?
घरात आपण आपले चलन (वर्चस्व,सत्ता) ठेवू नये. जो मनुष्य वर्चस्व ठेवतो त्याला भटकावे लागते. आम्ही पण हीराबां (दादाश्रींच्या पत्नी) ना सांगितलेले होते की आम्ही खोटे नाणे आहोत. आम्हाला भटकलेले परवडणार नाही ना! न चालणाऱ्या नाण्याने काय करावे? त्याने देवाजवळ बसून राहायचे. घरात तुमचे वर्चस्व गाजवायला जाल तर संघर्ष होईल ना? आपण तर आता समभावे निकाल करायचा. घरात बायकोसोबत फ्रेंड (मित्रा) सारखे राहायचे. ती तुमची फ्रेंड आणि तुम्ही तिचे फ्रेंड! इथे कसल्या नोंदी ठेवायच्या नाही की सत्ता तुझी होती की त्याची होती! म्युनिसिपालिटीत पण नोंद होत नाही आणि देवाकडेही नोंद होत नाही.