________________
७०
क्लेश रहित जीवन
तुम्हाला नाश्त्याशी काम आहे की सत्तेशी काम आहे? म्हणून चांगला नाश्ता कशाप्रकारे मिळेल तेवढेच बघा. म्युनिसिपालिटीवाले जर नोंद करत असतील की घरात कोणाची सत्ता आहे तर मी पण एडजस्ट झालो नसतो, पण वास्तवात अशी नोंद कोणीच करत नाही!
तुमचे पाय दुखत असतील आणि बायको तुमचे पाय चेपत असेल आणि त्यावेळी कोणी आले आणि हे पाहून म्हणाले की, ओहोहो! तुमची तर घरात चांगलीच सत्ता आहे. तेव्हा तुम्ही म्हटले पाहिजे की, 'छे, छे, सत्ता तर तिचीच आहे.' आणि तुम्ही जर असे म्हटले की हो, माझीच सत्ता आहे, तर ती पाय चेपायचे सोडून देईल. त्यापेक्षा तुम्ही म्हणा की, नाही, घरात तीचीच सत्ता आहे.
प्रश्नकर्ता : यास मस्का लावले असे नाही का म्हणता येणार?
दादाश्री : नाही, याला स्ट्रेट वे (सरळ रस्ता) म्हटला जातो, आणि दुसरे सगळे आडवळणाचे रस्ते म्हटले जातील. या दुषमकाळात सुखी होण्यासाठी मी जो रस्ता सांगतो तो वेगळा रस्ता आहे. मी या काळासाठी सांगत आहे. आपण आपला नाश्ता का बरे बिघडवायचा? सकाळचा नाश्ता बिघडेल, दुपारचे जेवण बिघडेल, पूर्ण दिवस बिघडेल!!
रिअॅक्शनरी प्रयत्नच करुच नये प्रश्नकर्ता : सकाळी झालेले भांडण दुपारी विसरूनही जातो आणि संध्याकाळी पुन्हा नवीन भांडण होते.
दादाश्री : भांडण कुठल्या शक्तीमुळे होते ते आम्ही जाणतो. ती वेडेवाकडे बोलते त्यात कोणती शक्ती काम करत आहे. तेही आमच्या लक्षात येते. बोलून पुन्हा एडजस्ट, होतो, हे सर्व ज्ञानाने समजेल असे आहे, तरी देखील जगात वावरताना एडजस्ट व्हायचे. कारण प्रत्येक गोष्ट 'अंत येणारी' असते. आणि कदाचित ते दीर्घ काळापर्यंत टिकली तर तुम्ही त्यात मदत करत नाही, उलट जास्त नुकसान करता. तुमचे स्वतःचेही