________________
६८
क्लेश रहित जीवन
दादाश्री : आम्ही समजावतो त्यानंतर या भिंतीबरोबर सुद्धा संघर्ष होणार नाही. या भिंतीवर आपटतात त्यात कोणाचा दोष? ज्याला लागले त्याचा दोष. त्यात भिंतीला काय देणेघेणे? चिकट मातीत तुमचा पाय सरकला तर चूक तुमचीच. चिकट माती तर फक्त निमित्त आहे. तुम्ही निमित्त समजून मातीत पायाची बोटे रुतवून घ्यावी. चिकट माती तर असतेच आणि घसरवणे हा तर तिचा स्वभावच आहे.
प्रश्नकर्ता : पण भांडण होण्याचे कारण काय? एकमेकांचे स्वभाव जुळत नाही म्हणून?
दादाश्री : अज्ञानता आहे म्हणून. संसार त्यासच म्हताले जाते ज्यात कोणाशीच कोणाचा स्वभाव जुळत नाही. हे ज्ञानच त्यावर एकमात्र उपाय आहे, ‘एडजस्ट एव्हरीवेर' कोणी तुला मारले तरीही तुला त्याच्याशीही एडजस्ट होऊन जायचे.
प्रश्नकर्ता : बायकोशी बऱ्याचदा भांडणे होतात. अगदी वीट येतो.
दादाश्री : नुसता वीट येतो असे नाही, कित्येक तर समुद्रात जाऊन जीव देतात, दारू पिऊन येतात.
सर्वात मोठे दुःख कशाचे आहे? तर 'डीसएडजस्टमेन्ट' चे. तिथे 'एडजस्ट एव्हरीवेर' केले तर काय वाईट आहे.
प्रश्नकर्ता : यासाठी तर पुरुषार्थ हवा.
दादाश्री : पुरुषार्थाची गरज नाही. फक्त माझी आज्ञाच पाळायची की, 'दादांनी' एडजस्ट एव्हरीवेर असे सांगितले आहे. मग एडजस्ट होता येईल. बायको म्हणाली की 'तुम्ही चोर आहात.' तर म्हणायचे की, 'यु आर करेक्ट' आणि थोड्यावेळाने म्हणाली की, 'नाही, तुम्ही चोरी केली नाही.' तेव्हा सुद्धा म्हणा की 'यु आर करेक्ट.'
ब्रम्हदेवाचा एक दिवस म्हणजे आपले संपूर्ण आयुष्य!