________________
७२
क्लेश रहित जीवन
जबाबदारी. त्याला समजले नाही तर तुम्ही काय करणार ? त्याला उपाय नाही. तुम्ही फक्त एवढेच म्हणा की, 'हे दादा भगवान! याला सद्बुद्धी द्या.' एवढे तुम्हाला म्हणावे लागेल. त्याला तुम्ही अधांतरी सोडू शकत नाही, ही काही नुसती थाप नाही. हे दादांचे एडजस्टमेन्टचे विज्ञान आहे, आश्चर्यकारक एडजस्टमेन्ट आहे हे. आणि जिथे तुम्ही एडजस्ट होत नाही तिथे तुम्हाला ते समजून येईलच ना ? डीसएडजस्टमेन्ट म्हणजेच मूर्खपणा. कारण त्याला वाटते की माझा नवरेपणा मी सोडणार नाही, आणि माझेच वर्चस्व राहिले पाहिजे! मग आयुष्यभर उपाशी मरशील आणि एक दिवशी ताटात विष पडण्याची वेळ येईल! सहज चालत आहे, त्यास चालू दे ना ! हे तर कलियुग आहे ! वातावरणच कसे झाले आहे !! म्हणून बायको जर म्हणाली की, 'तुम्ही नालायक आहात.' तर म्हणावे 'खूप छान. '
प्रश्नकर्ता : माझी बायको मला नालायक म्हणाली, की डोक्याचा पारा चढतो.
दादाश्री : मग तुम्ही कोणता उपाय कराल ? तू डबल नालायक आहेस असे म्हणणार का ? त्यामुळे तुमची नालायकी पुसली गेली का? तुमच्यावर एक शिक्का मारला म्हणून काय तुम्ही दोन शिक्के मारायचे ? मग नाश्ता बिघडेल आणि पूर्ण दिवसही बिघडेल.
प्रश्नकर्ता : एडजस्टमेन्टची जी गोष्ट आहे, त्यामागील भाव काय आहे ? मग कुठे पोहोचायचे आहे ?
दादाश्री : भाव शांतीचा आहे, शांती मिळवणे हा हेतू आहे. वाटू नये यासाठी एक युक्ती आहे.
अशांती
ज्ञानीकडून 'एडजस्टमेन्ट' शिका
एक भाऊ होते. ते रात्री दोन वाजता बाहेरून काय - काय कारनामे करून येत असतील त्याचे वर्णन करण्यासारखे नाही. तुम्हीच समजून