________________
७४
क्लेश रहित जीवन
घराच्या माणसांशी कधीही भांडू नये. तिथेच जर राहायचे आहे मग भांडण-तंटे कशासाठी? दुसऱ्यांना त्रास देऊन स्वत: कधीही सुखी होऊ शकत नाही, आणि आपल्याला तर दुसऱ्यांना सुख देऊन सुखी व्हायचे आहे. आपण घरात सुख दिले तरच आपल्याला सुख मिळेल आणि चहापाणी पण चांगले बनवून देतील नाहीतर चहा-पाणी सुद्धा नीट देणार नाहीत. कमजोर नवरा बायकोवर शूरवीर. ज्यांचे रक्षण करायला पाहिजे त्यांचे भक्षण कसे करू शकतो! जो आपल्या आश्रित आहे त्याचे रक्षण करायला हवे, हेच सर्वोच्च ध्येय असले पाहिजे. त्याच्याकडून गुन्हा झाला असेल तरीदेखील त्याचे रक्षण करायला पाहिजे. हे पाकिस्तानचे सैनिक आता आपल्या इथे (भारतात) कैदेत आहेत तरीही त्यांचे रक्षण केले जाते ना! मग हे तर आपल्या घरातलेच आहेत ना! हे तर बाहेरच्यांसमोर मांजरीसारखे होतात, तिथे भांडण करत नाहीत आणि घराच्यांवरच शूरता दाखवतात! स्वत:च्या हाताखालच्या माणसांना तुडवत राहतात आणि वरिष्ठांना साहेब, साहेब करतात. पोलीसवाल्याने धमकावले तर त्याला 'साहेब, साहेब' म्हणेल आणि घरी बायको खरे बोलत असेल तरी त्याला सहन होणार नाही आणि तिच्यावर ओरडेल. 'माझ्या चहाच्या कपात मुंगी कुठून आली?' असे ओरडून घरच्यांना दरडावतो आणि पोलीसवाल्या समोर थरथरतो आता यास तर घोर अन्याय म्हटला जाईल. आपल्याला हे शोभत नाही. बायको तर स्वतःची भागीदार म्हटली जाते. तिच्याशीही भांडण? घरात असे क्लेश होत असतील तर काही मार्ग काढावा लागतो, समजवावे लागते. घरातच राहायचे मग क्लेश कशाला?
'सायन्स' समजून घेण्यासारखे प्रश्नकर्ता : आपली क्लेश करायची इच्छा नसेल पण समोरून कोणी भांडायला येत असेल तर काय करावे? त्यात एक जागृत असेल आणि दुसरा क्लेश करत असेल अशा परिस्थितीत भांडण तर होणारच ना?