________________
५४
क्लेश रहित जीवन
'असे का केलेस? आता असे होता कामा नये' असे वरवर नाटकीय बोललेच पाहिजे. नाहीतर मुलाला असेच वाटेल की आपण जे काही करीत आहोत ते योग्यच करीत आहोत. कारण बापाला ते मान्य आहे. वेळप्रसंगी त्यांना टोकले नाही म्हणून तर तुमची मुले तुमच्या डोक्यावर बसली आहेत. बोलायचे सर्व परंतु नाटकीय! मुलांना रात्री जवळ बसवून शांतपणे समजवावे, चर्चा करावी. घरातील सगळेच कानेकोपरे साफ करावे लागतील ना? मुलांना थोडेसेच हलवण्याची गरज असते. तसे संस्कार तर असतातच पण थोडे कडक व्हावे लागते. त्यांना असे हलवण्यात काही गुन्हा आहे का?
प्रश्नकर्ता : दादा, माझा मुलगा पंधराशे रुपये कमावतो. मी रिटायर्ड (सेवानिवृत्त) आहे, मी त्याच्यासोबत राहतो. तर आता मुलगा आणि सून मला सारखे टोकत राहतात की, 'तुम्ही असे का करतात? बाहेर का जाता?' म्हणून मी आता त्यांना सांगूनच टाकणार की, मी घर सोडून जातो.
दादाश्री : तुम्हाला खायला-प्यायला नीट देतात ना? प्रश्नकर्ता : हो दादा.
दादाश्री : तर मग घर सोडून जातो असे अजिबात बोलू नका. जर असे बोलून सुद्धा तुम्ही जाऊ शकला नाहीत, तर तुमचे शब्द तुम्हालाच गिळावे लागतील.
प्रश्नकर्ता : म्हणजे मग मी त्यांना काहीच सांगू नको का? ।
दादाश्री : फार तेव्हा हळूवारपणे त्यांना एवढेच सांगावे की, 'तुम्ही असे केलेत तर बरे होईल, मग ऐकणे न ऐकणे हे तुमच्या मर्जीची गोष्ट आहे.' तुमची चापट समोरच्याला लागेल अशी असेल आणि त्यामुळे त्याच्यात काही परिवर्तन येत असेल तर काही बोला. पण जर पोकळ चापट मारली तर तो उलट जास्त उद्धटपणा करेल. त्यापेक्षा न मारणे हेच उत्तम (न बोलणेच बरे.)